'अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली,' अभिनेत्री पायल घोषचा आरोप

पायल घोष अनुराग कश्यप

फोटो स्रोत, Instagram

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पायल घोषने ट्वीट करून हे आरोप केले आहेत.

अनुराग कश्यपला टॅग करत पायल घोषने म्हटलंय, "अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली. नरेंद्र मोदी यांना मी विनंती करते की, त्यांनी याविरोधात कारवाई करावी आणि सत्य काय आहे हे समस्त देशासमोर यावे. जाहीरपणे हे सांगणे माझ्यासाठी नुकसानकारक आहे याची मला कल्पना आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया मला मदत करा."

पायल घोष अनुराग कश्यप

फोटो स्रोत, @IAMPAYALGHOSH

पायलच्या या ट्विटला अभिनेत्री कंगना राणावतने रिट्विट केले आहे. रिट्विट करताना कंगनाने #MeToo हॅशटॅगचा उल्लेख केला. कंगना आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, "प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक करा."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रीय महिला आयोगानेही पायल घोषच्या या ट्वीटची दखल घेतली आहे. अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारे ट्वीट रिट्विट करत आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याप्रकरणी पूर्ण माहिती मागवली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

रेखा शर्मा आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, "तुमची बाजू सविस्तरपणे ncw@nic.in आणि @NCWIndia यावर लिहू शकता. या प्रकरणाची दखल घेतली जाईल."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या आवाहनाला पायलने प्रतिसाद देत म्हटलं, "धन्यवाद, मी असेच करेन."

या संपूर्ण प्रकरणावर अनुराग कश्यप काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष होते. अनुराग कश्यपने रात्री उशिरा 12.38 मिनिटांनी हिंदीत चार ट्वीट केलेत.

अनुराग आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, "कमाल आहे, मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतला. हरकत नाही. मला गप्प करण्यासाठी एवढे खोटे बोलावे लागले की दुसऱ्या महिलांनाही यात खेचून आणले. थोडं तरी मर्यादेत रहा मॅडम. मी इतकंच म्हणेण की तुमच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही."

अनुराग कश्यप पुढील ट्वीटमध्ये म्हणतात, "माझ्यावर आरोप करता करता इतर कलाकार आणि बच्चन कुटुंबालाही यात ओढलं. पण काही साध्य करता आले नाही. मॅडम, दोन लग्न केली आहेत. जर हा गुन्हा आहे तर मंजूर आहे. प्रेमही केले आहे तेही मान्य आहे."

पायल घोष अनुराग कश्यप

फोटो स्रोत, Twitter

"माझी पहिली पत्नी असो वा दुसरी पत्नी किंवा माझी प्रेमिका असो वा माझ्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री असो किंवा त्या सर्व मुली ज्या माझ्या टीममध्ये काम करतात, ज्यांना मी एकांतात भेटलो असेन वा लोकांमध्ये मी अशा पद्धतीने कधीही वागत नाही आणि कोणत्याही किमतीवर अशी वागणूक सहनही करत नाही."

अनुराग कश्यप पुढे लिहितात, "बाकी जे काही होईल ते पाहूयात. तुमच्या व्हीडिओमध्येच दिसते यात किती सत्य आहे आणि किती नाही. बाकी तुमच्यासाठी प्रार्थना आणि प्रेम. तुमच्या इंग्रजी ट्वीटचे उत्तर हिंदीतून दिल्याबद्दल क्षमस्व."

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. गटबाजी आणि जाहीरपणे बोलणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

अनुराग कश्यप

फोटो स्रोत, Getty Images

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून, एक गट न्यायालयीन सुनावणीशिवाय रियाला दोषी ठरवत असल्याचे दिसून येत आहे.

मीडिया ट्रायल होत असल्याची टीका केली जात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निष्कर्ष काढावा असा सल्लाही देण्यात येतोय.

या प्रकरणावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. अनुराग कश्यप सुद्धा या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. कंगना राणावतकडूनही सतत टीका केली जात आहे. त्यामुळे अनुराग आणि कंगना यांच्या ट्विटरवर वाद सुरू आहेत.

पायल घोष कोण आहे?

2017 मध्ये 'पटेल की पंजाबी शादी' या सिनेमात पायलने अभिनेता परेश रावल यांच्या मुलीची भूमिका केली होती. पायल बॉलिवूडमधला लोकप्रिय चेहरा नाही. काही दाक्षिणात्य सिनेमांमध्ये पायलने काम केले आहे. बहुतांश काम तेलुगू सिनेमांमध्ये केले आहे. तसेच 'साथ निभाना साथीया 2' या हिंदी मालिकेतही पायलने अभिनय केला आहे.

बॉलिवूडमधली गटबाजी चव्हाट्यावर

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडमध्ये गटबाजी आणि जाहीर टीकाकारांची मोठी रांगच लागली आहे. यात ड्रग्सचा अँगल आल्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि भाजप रवि किशन यांनी लोकसभेत बॉलिवुड आणि ड्रग्सचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्यावर बोलताना अनुराग कश्यपने रवि किशनविषयी एक खुलासा केला होता. पत्रकार फाए डिसूझा यांना दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने हे सांगितलं होतं, की "मुक्काबाज मध्ये जेव्हा मी रवि किशन बरोबर काम केलं होतं, तेव्हा त्याला मी स्वतः अनेकदा गांजा मारताना पाहिलं होतं. मी हे नाही म्हणत आहे की ते चूक आहे किंवा काही. कारण त्याची ही सवय जगजाहीर आहे.

"आता कदाचित तो भाजप खासदार झाल्यामुळे शुद्ध असल्यासारखा वागत असेल, पण माझ्यासमोर तरी तो तसा नव्हता. मला त्यावर काही आक्षेप नाही आणि मी त्याला जजसुद्धा करत नाहीय. कारण त्याच्या या सवयीमुळे त्याच्या कामावर कुठलाही परिणाम नव्हता होत. त्याचा अभिनय नेहमीच उत्तम राहायचा."

"मला फक्त हे पटत नाही की त्याने समाजाला याविषयी ज्ञान द्यावं आणि हे किती वाईट आहे, हे दाखवून बॉलिवुडकडे बोटं दाखवावीत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)