You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीबाईंच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणाऱ्या फातिमा शेख
सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिकेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल समग्रमपणे लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या असंही म्हटलं जातं. एका कथेनुसार जेव्हा महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांचा वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. पण उस्मान शेख यांच्याविषयीही फारशी माहिती मिळत नाही.
फातिमा शेख यांच्याविषयी एक धागा सापडतो 'सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय' या पुस्तकात. त्या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यात सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून फातिमा शेख आहेत.
बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.
या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?
- रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला
- फाळणीतल्या निर्वासितांना आधार देणाऱ्या इंदरजीत कौर
- मुथुलक्ष्मी रेड्डी : देवदासीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदा संमत करून घेणारी महिला
- मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या रुकैया हुसेन
- चंद्रप्रभा सैकयानी: अविवाहित माता जिने आसाममधली पडदापद्धत संपवली
- सुगरा हुमायूँ मिर्झा : बुरखा प्रथेचा अडसर दूर करत स्त्रियांचा आवाज बुलंद करणारी रणरागिणी
- कमलादेवी चट्टोपाध्याय : भारतात निवडणूक लढवणारी पहिली महिला
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)