कमलादेवी चट्टोपाध्याय : भारतात निवडणूक लढवणारी पहिली महिला

Published

कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ देण्यासाठी गांधींजीचं मन वळवलं.

1926मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली.आर्यलँडच्या नेत्या मार्गरेट कमिन्स यांनी कमलादेवींना उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिलं.

कमलादेवी ती निवडणूक कमी मतांच्या फरकाने हरल्या पण त्यांनी महिलांच्या राजकीय पदांमधल्या भागीदारीचा मार्ग सुकर केला.

कमलादेवींनी सहकार चळवळ मजबूत केली आणि इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनची स्थापना केली. या संस्थेने भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान आलेल्या निर्वासितांचं फरीदाबादमध्ये पुनर्वसन केलं.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि क्राफ्ट्स काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली. लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन नॅशनल थिएटरची स्थापना केली. हीच संस्था पुढे जाऊन प्रसिद्ध नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बनली. कमलादेवींच्या प्रयत्नांनी संगीत नाटक अकादमीची स्थापना झाली.

कमलादेवींना आपल्या कार्यासाठी पद्मभूषण, पद्मविभूषण तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)