मदन शर्मा हल्ला: गुंडगिरी ही शिवसेनेची सवय - रामदास आठवले

मदन शर्मा

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, मदन शर्मा
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मदन शर्मा असं मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याचं नाव असून ते मुंबईमध्ये कांदिवली परिसरात राहतात.

मदन शर्मा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

ते म्हणाले, "मी जखमी आहे तसंच तणावाखाली सुद्धा आहे. जे काही घडलं, ते दु:खद आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कायदा-सुव्यवस्था सांभाळू शकत नसाल, तर राजीनामा द्या."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"मला, माझ्या मुलांना, कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या कुटुंबाला संरक्षण देण्याची विनंती करतो," असंही ते म्हणालेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"उद्धव ठाकरे यांच्या संघटनेने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. पुन्हा कोणाबरोबर अशी घटना घडता कामा नये," असं ते पुढे म्हणाले.

गुंडगिरी ही शिवसेनेची सवय - रामदास आठवले

कथित शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेतली.

"मदन शर्मा नौदलात अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. कार्टूनमध्ये चूक काहीच नाही. सोनिया गांधींना महत्त्व देऊन ते प्रणाम करताना दिसतायेत, तर शरद पवार पिताश्री दाखवलंय. मदन शर्मांनी ते फक्ट फॉरवर्ड केलं होतं. वास्तविक शिवसैनिकांनी कार्टून काढणाऱ्यावर राग व्यक्त करायला हवा होता. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण चुकीची आहे. त्यात आरोपींना तातडीनं जामीन सुद्धा मिळाला."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

"मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र, सरकार त्यांचं असल्यां पोलिसांनी दबावात येऊन तसं केलं नाही. नौदलाच्या अधिकाऱ्यावर हल्ला होणं चांगली गोष्ट नाही. त्या कार्यकर्त्यांनी पोलिसात जायला हवं होतं. मात्र, अशाप्रकारची गुंडगिरी शिवसेनेची सवय आहे," असंही आठवले म्हणाले.

"मदन शर्मांवर अन्याय झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून मदन शर्मांना न्याय मिळवून देईन," असं आठवलेंनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या आरोपात तथ्य नाहीय. फोटो फॉरवर्ड करण्यात कुठलीच मोठी चूक नाही, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने करून दिली भाजपला सोनू महाजन प्रकरणाची आठवण

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 2016 साली घडलेल्या लष्करी अधिकारी सोनू महाजन यांच्या हत्येची आठवण भाजपला करून दिलीय. चाळीसगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचा यात हात असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात त्यावेळी राज्यात सरकार होते.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

महाजन यांच्या कुटुंबाने FIR दाखल करून घेण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये FIR दाखल करण्यात आलं. मात्र, अजूनही भाजप खासदाराविरोधात कुठलीच कारवाई झाली नसल्याचं सचिन सावंत म्हणाले आहेत.

भाजपची शिवसेनेवर टीका

या प्रकरणात भाजप नेत्यांनी शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं, हे गुंडाराज थांबलं पाहिजे, महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशतीसारखं वातावरण तयार होतंय अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे त्यांना कथितरित्या शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि सात ते आठ कार्यकर्त्यांनी शर्मा यांना मारहाण केली, असा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

हा प्रकार दुःखद आणि धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे गुंडाराज आवरा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण?

माजी नौदल अधिकारी मारहाणप्रकरणी सर्वप्रथम टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने बातमी दिली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी (11 सप्टेंबर) दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

"मी फक्त व्हॉट्सअॅपवर एक कार्टून फॉरवर्ड केलं होतं. हीच माझी चूक होती. मला काहीच न बोलता थेट घरात घुसून मला मारहाण करण्यास सुरू केली. तसंच त्यानंतर पोलीसही मला अटक करायला आले, असा आरोप शर्मा यांनी केला. याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या मदतीमुळे माझी अटक टळली," असंही शर्मा यांनी म्हटलं.

समतानगर पोलीस ठाणे इथं याप्रकरणी कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारची दहशत वाढतीये- कंगना राणावत

दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने कंगना राणावतच्या पाली हिलमधील बंगल्यातील ऑफिसचं पाडकाम केलं होतं. त्यावरून वातावरण तापलेलं असतानाच हा प्रकार घडल्याचं समोर आलं. याप्रकरणी कंगनानेही शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

"महाराष्ट्रात सरकारची दहशत आणि अत्याचार वाढत चालला आहे. आज त्यांनी एका निवृत्त अधिकाऱ्याला फक्त सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून मारहाण केली," अशी प्रतिक्रिया कंगना राणावतने दिली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणी शिवसेनेवर निशाणा साधला. सोशल मीडिया पोस्टमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांना आता मारहाण करणार का? निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण करण्यात आली. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास कांदिवली पोलीस ठाण्यात धरणे आंदोलनास बसेन, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

अद्याप शिवसेनेने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला.

"हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे अद्याप आपल्याला माहिती नाही. त्याची सविस्तर माहिती घेऊन आपण प्रतिक्रिया देऊ," असं परब यांनी म्हटलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यात शिवसेना शाखा प्रमुखाचा समावेश असल्याची बातमी टीव्ही 9 मराठीनं दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)