आंध्र प्रदेश : विशाखापट्टणममध्ये ट्रायल रनदरम्यान क्रेन कोसळली, 11 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, UGC
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये शनिवारी (1 ऑगस्ट) एका भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये एक क्रेन पडल्यामुळे हा अपघात झाला.
विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी या प्रकरणी 11 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'द हिंदू'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पर्यटनमंत्री एम श्रीनिवास राव यांनी स्थानिक प्रशासनासोबत याबद्दल चर्चा केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राव यांनी म्हटलं, की त्यांची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून जिल्हा प्रशासनानं एक टीम घटनास्थळी पाठवली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवेदन
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं या प्रकरणी ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम जिल्हाधिकारी आणि शहराचे पोलिस आयुक्त यांना यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फोटो स्रोत, UGC
जिल्हाधिकारी विनय चंद यांनी म्हटलं, की नवीन क्रेनची ट्रायल रन सुरू असताना हा अपघात झाला. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आम्ही हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडला दिले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनालाही उच्चस्तरीय समिती स्थापन करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'द हिंदू'च्या वृत्तानुसार हिंदुस्तान शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक पोलिस आणि कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























