कोरोना चाचणीसाठी गेलेल्या युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब, लॅब टेक्निशियनला अटक

फोटो स्रोत, JIM HOWELLS/BBC THREE/ISTOCK
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अमरावती मध्ये एका तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. स्वॅब घेणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीचा बडनेरा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेण्यात आला.
बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा योग्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असल्याची माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे. अल्पेश अशोक देशमुख (30 ) अस आरोपीचे नाव असून तो बडनेराच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.
फिर्यादी 24 वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत असून एका ठिकाणी काम करते. तिथे तिचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला म्हणून ती चाचणीसाठी सदर लॅबमध्ये गेली.
तिच्याबरोबरच इतर 20 सहकाऱ्यांची देखील चाचणी घेण्यात आली. आरोपीने तरुणीला सां त्यामुळं त्याच्या संपर्कातील 20 जणांची 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी देशमुखने फिर्यादी मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. फिर्यादी तरुणीने युरिनल तपासणी बाबत तिच्या महिला सहकाऱ्याला कळविली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले.

फोटो स्रोत, iStock
त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली.
त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अॅट्रोसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 24 जुलैला वॉल मार्ट मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी कोविड रुग्णालयात बोलावण्यात आले होते.
त्यापैकी त्याच मॉल मध्ये काम करणारी एक तरुणी स्वाब घेण्यासाठी सेंटर वर आली असता तिचा ओरल स्वाब घेऊन गुप्तांगातून स्वाब घेण्यात आला. आम्ही आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केल्याचं बडनेरा पोलीस अधिकारी पंजाब वंजारी यांनी सांगितले.
त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तसंच बाकी मुली, महिलांबरोबर असा प्रकार घडू नये यासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे, असं स्थानिक खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
"ज्या जिल्ह्याने महिला खासदार, महिला पालकमंत्री, महिला राष्ट्रपती दिल्या आहेत. या गावात असा प्रकार घडणं म्हणजे आम्हीही आमच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर घेतो तेव्हा त्याच्या कामाच्या ठिकाणची हिस्टरी आपण चेक करतो का? असा माझा प्रश्न आहे. तो आधी कुठे काम करत होता हे पाहतो का? त्याला कोणता मानसिक आजार होता का? हे चेक न करता आपण एखाद्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर घेतो तेव्हा असा प्रकार घडतो.
ती मुलगी सक्षम नसती तर ती पोलीस स्टेशनपर्यंत गेलीच नसती. आम्ही महिला सक्षम असल्यानेच राष्ट्रपती, खासदार, आमदारपदी बसलो आहोत. बाकी महिलांना सुरक्षित ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनची जबाबदारी आहे", असं त्या पुढे म्हणाल्या आहेत.
कडक कारवाई - ठाकूर
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी कडक कारवाई केल्याचं म्हटलं आहे.
"सबंधित लॅबमधील टेक्निशिअनवर कडक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेची 354, 376 दोन्ही कलमं लावण्यात आली आहेत. या टेक्निशिअनवर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा असं कृत्य करायला कोणी धजावणार नाही. महिलांच्या छेडछाडीची, अपमानाची प्रकरणं सहन केली जाणार नाहीत," असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांचे सवाल
अतिशय संतापजनक घटना बडनेऱ्यात घडली आहे. मुलीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्यात आला आणि तेही सरकारी लॅबमध्ये. कशी काय त्या टेक्निशिअनची हिंमत झाली? तो त्या मुलीला असं कसं काय घेऊन गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे सरकारने यासंदर्भात जनजागृती करणं आवश्यक आहे. स्वॅब टेस्टिंग फक्त आणि फक्त नाकाद्वारे घेतली जाते हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं, असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"क्वारंटीन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत, लहान मुली सुरक्षित नाहीत. बाहेर नाहीत आणि आता तर लॅबमध्येही नाहीत. स्वॅब टेस्टिंगच्या नावावर कुठे कुठे काय काय घडत असेल? सरकारचं महिला सुरक्षेकडे लक्ष नाही. महिला सुरक्षेवर न थकता बोलणारे नेते कुठे आहेत आता? दिशा कायदा येणार होता त्याचं काय झालं? आणखी अशा किती घाणेरड्या वाईट घटना आमच्यासोबत घडल्यानंतर सरकार जागेवर येणार आहे," असे सवाल वाघ यांनी विचारले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
























