जितेंद्र आव्हाड: 'कोरोनाविरोधातल्या माझ्या लढाईला यश, घरी सुखरूप परतलो'

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना व्हायरसविरोधात यशस्वी लढा दिलाय. ते बरे होऊन घरी परतले. आपल्या ट्विटर हँडलवरूनच त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
"गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलं असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या," असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तसंच, परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी लढण्यास सज्ज होऊया, असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
कोरोनाची लागण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात उपचार घेत होते. आज घरी परतताना त्यांनी फोर्टीसमधील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.
शरद पवार, उद्धव ठाकरे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले - आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार व्यक्त केले.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

ते म्हणाले, "या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड शरद पवार साहेब, जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे उद्धवजी ठाकरे, सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले."

फोटो स्रोत, Twitter
पत्नी आणि मुलीच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती, असंही आव्हाडांनी नमूद केलं.
याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकाना भेटण्यास न येण्याची विनंतीही केलीय. डॉक्टरांनी महिनाभर सक्तीची विश्रांती सांगितल्यानं कुणालाही भेटता येणार नसल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
"माझ्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल, असं आव्हाडांनी ट्विटरवरून सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























