काश्मीर चकमकीत जीव गमावलेल्या सैनिकांना नरेंद्र मोदी यांची आदरांजली

फोटो स्रोत, ANI
भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसातील पाच जणांचा मृत्यू झाला.
कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा इथं पहाटे 3.30 वाजता ही चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन कट्टरतावाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार केलं.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील 21 राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग आर्मी ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज या वरिष्ठ पदावरील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच, जम्मू-काश्मीर पोलिसातील पोलीस उपनिरीक्षक शकील काजी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
हंदवाड्याच्या चांगिमुलमधील एका घरातल्या लोकांना कट्टरतावाद्यांनी ताब्यात घेतले होते. कट्टरतावादी त्या घराचा वापर लपण्यासाठी करत होते.
भारतीय गुप्तचर यंत्रणेला कट्टरतावादी चांगिमुलमधील घरात लपल्याची माहिती मिळाली होती, अशी माहिती भारतीय लष्करानं दिलीय.
जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं संयुक्तपणे कारवाई करत या घरावर छापा मारला. त्यावेळी दोन्हीकडून गोळीबार सुरू झाली. बीबीसीचे सहकारी पत्रकार माजिद जहाँगीर यांनी सुरक्षा दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती दिली.

फोटो स्रोत, ANI
"हंदवाडा इथं देशासाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या धैर्यवान सैनिकांना आदरांजली. त्यांचं शौर्य आणि त्याग देश विसरणार नाही. देशसेवेसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. नागरिकांच्या रक्षणासाठी त्यांनी अविरत योगदान दिलं. योद्धांच्या कुटुंबीयांच्या, मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहोत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या सैनिक आणि पोलिसांना श्रद्धाजंली अर्पण केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"सैनिक आणि सुरक्षारक्षकांच्या मृत्यूमुळं प्रचंड दु:ख झालंय. या सगळ्यांनीच दहशतवादाविरोधात लढाई लढून शौर्य दाखवलंय. देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलंय. त्यांचं शौर्य आम्ही कधीच विसरणार नाही," अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ज्या घरात कट्टरतावादी लपले होते, त्या घरातील सर्वांना सुखरूप सोडवण्यात भारतीय सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं. मात्र, चकमकीत अधिकारी आणि पोलिसांचा जीव गेल्यानं दु:ख व्यक्त करण्यात येतंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)