लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेशमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शुरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
मध्य प्रदेशात सहा वर्षांच्या एका चिमुकलीवर बलात्कार करून नंतर तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आलीय.
दमोह जिल्ह्यामधल्या जबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंशीपूर गावात ही घटना घडलीय.
या जखमी मुलीला सुरुवातीला दमोह जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला जबलपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखण करण्यात आलं.
या मुलीने आरोपींना ओळखू नये म्हणून तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे.
बुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना ही मुलगी नाहीशी झाल्याचं पोलीसांनी सांगितली.
रात्रभर या मुलीचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (23 एप्रिल) सकाळी ही मुलगी घराजवळच्याच एका सुनसान जागी मिळाली. ही जागा मोहन सिंह नावाच्या व्यक्तीची आहे. या मुलीचे दोन्ही हात बांधलेले होते आणि डोळ्यांना गंभीर जखमा झालेल्या होत्या.
दमोहचे पोलीस अधीक्षक हेमंत चौहान यांनी बीबीसीला या घटनेविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "या मुलीच्या शरीरावर इतरत्रही जखमा आहेत. या प्रकरणी सचिन सेन नावाच्या 21 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे."

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI/BBC
पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
या मुलीच्या दृष्टीबद्दल सध्या सांगणं कठीण असल्याचंही हेमंत चौहान यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "तिचे दोन्ही डोळे सुजलेले आहेत, त्यामुळे दृष्टीक्षमतेचं किती नुकसान झालंय हे समजू शकत नाही. तिला दिसतंय की नाही, हे देखील अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही."
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशामध्ये बलात्काराच्या घटनांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाणही इथे सर्वात जास्त आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2018 च्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात बलात्काराच्या 6,480 घटना नोंदवण्यात आल्या. यापैकी 3,887 घटना अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या होत्या.
मध्य प्रदेशात लहान मुली सुरक्षित नाहीत का, असं म्हणत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"इतकी क्रूर घटना...ती देखील लॉकडाऊन दरम्यान? जिथे सामान्यांना गरजेच्या वस्तूंसाठीही घराबाहेर पडता येत नाही, तिथे गुन्हेगार खुलेआम फिरतायत. बलात्कार, खून, शेतकऱ्यांची हत्या, गोळीबार, चाकूहल्ल्याच्या घटना घडतायत. एक महिन्याचं तुमचं सरकार प्रदेशाला कोणत्या दिशेला घेऊन जातंय, असं ट्वीट कमलनाथ यांनी केलंय.
ही घटना लाजिरवाणी असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही म्हटलंय आणि आरोपींना लवकरात लवकर पडण्याचे आदेश दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सोशल मीडियावर त्यांनी लिहिलंय, "मी या घटनेची माहिती घेऊन अपराधींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्या क्रूरकर्म्याला लवकरात लवकर कडक शिक्षा दिली जाईल."
मध्य प्रदेशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून संसर्गाचे आकडे सतत वाढत असताना ही घटना घडलीय.
मध्य प्रदेशातल्या संसर्ग प्रकरणांची संख्या गुरुवारी 1,698 वर पोहोचलीय.
गुरुवारी (23 एप्रिल) भोपाळमध्ये 20 नवीन रुग्ण आढळले. तर उज्जैनमध्ये पहिल्यांदाच गुरुवारच्या एकाच दिवसात 27 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याला दुजोरा मिळालाय. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढून आता 87 झालेला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)