बबिता फोगाट: भारतीय कुस्तीपटूवरून ट्विटरवर का पडलेत दोन गट?

फोटो स्रोत, Getty Images
कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाटने आपण तबलीगी जमातविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट योग्य असल्याचं म्हटलं आहे.
मूळ हरियाणाच्या 30 वर्षांच्या या मल्ल बबिताने म्हटलंय, "मी माझ्या ट्वीटवर ठाम आहे. मी काहीही चुकीचं लिहिलेलं नाही."
जमात विषयीचं ट्वीट केल्यानंतर आपल्याला सतत धमक्या येत असल्याचा बबिताने शुक्रवारीही एक व्हिडिओ ट्वीट करत दावा केलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सुमारे सव्वा मिनिटाच्या या व्हिडिओत बबिताने म्हटलंय, "गेल्या काही दिवसांत मी काही ट्वीट्स केली होती. त्यानंतर मला लोकांकडून सोशल मीडियावर शिवीगाळ होतेय आणि धमक्या देण्यात येतायत. त्या लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कान उघडून ऐका आणि डोक्यात हे ठाम बसू द्या की धमक्यांना घाबरून घरी बसायला मी काही झायरा वसीम नाही... मी नेहमीच माझ्या देशासाठी लढलेय आणि कायम लढत राहीन."

फोटो स्रोत, Getty Images
जमातविषयीच्या आपल्या ट्वीटची पाठराखण करत बबिता म्हणते, "मी माझ्या ट्वीटवर ठाम आहे. मी फक्त त्या लोकांबाबत लिहिलंय ज्यांनी कोरोनाचं संक्रमण पसरवलं. मला तुम्हाला विचारायचंय."
झायरा वसीमने दंगल सिनेमात बबिताची बहीण गीताची भूमिका केली होती. या सिनेमात आमिर खानने बबिताचे वडील महावीर फोगाट यांची भूमिका वठवली होती. गेल्या वर्षी झायरा वसीमने अचानकच बॉलिवुडचा निरोप घेतला.
सोशल मीडियावर याबाबतची एक मोठी पोस्ट झायरा वसीमने लिहिली होती आणि त्यावर चर्चाही झडल्या होत्या.
बबिता फोगाटने केलेल्या ट्वीटवरून सध्या वाद निर्माण झालाय. कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी तिने जमात कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यानंतर बबिता फोगाटवर टीकेचा भडीमार झाला आणि ट्विटरवर #SuspendBabitaPhogat हॅशटॅग ट्रेंड झाला. याच्या विरोधात बबिताचे समर्थकही सोशल मीडियावरून व्यक्त झाले आणि तिला पाठिंबा देणारा #ISupportBabitaPhogat हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला.
बबिताप्रमाणेच बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेलनेही मुसलमानांमधल्या एका घटकावर टीका केली होती आणि वादग्रस्त ट्वीट्स केली होती. यानंतर ट्विटरने रंगोली चंडेलचा अकाऊंट सस्पेंड केला. बबिता फोगाटचा अकाऊंट सस्पेंड करण्यात आलेला नसला तरी तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी ट्विटरकडे केली आहे.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























