कोरोना व्हायरस : कर्नाटकातील कलबुर्गीत 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना विषाणुमुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोना विषाणुमुळे झालेला हा देशातला पहिला मृत्यू आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते कोव्हिड-19 चे संशयित होते. ते कोरोना विषाणूनेच दगावल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाचे आयुक्तांनी सांगितले आहे.

line

13 मार्च : राज्यातल्या शाळा बंद करण्याची पालकांची मागणी

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद केल्यानंतर आता महाराष्ट्रातही शाळा बंद कराव्यात अशी मागणी इंडिय वर्ल्ड वाईड पॅरेंट असोसीएशनने केली आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याला कोणताही धोका उद्भवू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्याची मागणी आता पालक करत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काही शाळांच्या व्यवस्थापन समितीने शाळा बंद करण्याचा निर्णय घेत काही कालावधीपर्यंत शाळा बंद केल्या आहेत. तर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालकांची चिंता वाढत चाललीय.

विद्यार्थ्यांना घराबाहेर पाठवण्याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. बहुतांश विद्यार्थी स्कूलबसने प्रवास करतात. त्यामुळे या मुलांचा संबंध सार्वजनिक जागांशी येत असल्याने पालक अधिक काळजी करत आहेत. याबाबतीत, राज्य सरकारकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गरज पडल्यास शाळा बंद करु असं वक्तव्य नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. पण त्यानंतर अजूनही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

line

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 14 वर

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 14 झाली आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याआधी, रुग्णांची संख्या 11 होती. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्तियांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरू आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत.

Presentational grey line
BBC
Presentational grey line

12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.

line

12 मार्च:दिल्लीत 31 मार्चपर्यंत चित्रपटगृह बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील चित्रपटगृहं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे.

line

कोरोनाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला

कोरोना व्हायरसने जगभर घातलेल्या थैमानामुळे पुन्हा एकदा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. सकाळी कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यापासून जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड दिसून आली.

मुंबई शेअर बाजार

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळीच 2500 पेक्षा जास्त अंकांनी खाली असल्याचं दिसून आलं तर निफ्टीही 700 अंकांनी कोसळला. 2017 नंतर निफ्टी पहिल्यांदाच 10,000 च्या पातळीखाली आला.

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी युरोपातून अमेरिकत येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध जाहीर केले.

कोरोना व्हायरस

याचे परिणाम अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर उमटले. डाऊ जोन्समध्ये 1500 अंकांची (5.8%) घसरण झाली.

अमेरिकेतल्या घसरणीचे परिणाम आज सकाळी आशियाई बाजारातल्या ट्रेडिंगवर झाला.

जपानचा निक्केई 225 इंडेक्स सकाळच्या ट्रेडिंगमध्ये 4.5%, हाँगकाँगचा हेंगसेंग इंडेक्स 3.8%, चीनचा शांघाय कॉम्पॉझिट इंडेक्स 2% पडला. भारतीय शेअरबाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या महिन्याभरात 20% घसरलेला आहे. गेल्या 10 वर्षांतली रिलायन्सच्या शेअर्समधली सगळ्यांत मोठी घसरण आहे.

जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 30 टक्क्यांची घसरण झाल्याने त्याचा परिणाम तेल उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवर झालाय.

line

12 मार्च 2020- नागपूरमधील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

कोरोना

नागपुरातील 11 संशयित रुग्णांपैकी 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघांचे अहवाल प्राप्त व्हायचे होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास दोनपैकी एका रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कुणा कुणाच्या संपर्कात आली, याचा आता आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन शोध घेत आहे. त्याच्यावर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना

त्यामुळे आता नागपूरकरांनी आता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा महसूल प्रशासनाकडून करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. करोना कुणाला झाला आहे, हे प्रथमदर्शनी लक्षात येत नसल्याने नागरिकांना सर्वांपासूनच थोडे अंतर ठेवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्विमिंग पूलचा वापरही शक्यतो टाळावा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

line

11 मार्च 2020- राज्यात 10 जणांना कोरोनाचा संसर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

राज्यात आतापर्यंत एकूण 10 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनासंदर्भात प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

कोरोना

10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असले, तरी त्यांच्यामध्ये तशी गंभीर लक्षणं दिसत नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 10 पैकी 8 रुग्ण हे पुण्यातील आहेत. हे सर्वजण रुग्णालयात असून त्यांच्यापैकी काहींना झालेली बाधा ही सौम्य आहेत, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंत (14 मार्च) संपविण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्री, प्रशासकीय अधिकारी हे मुंबईत आहेत. त्यांना आपापल्या मतदारसंघात किंवा विभागांमध्ये लवकरात लवकर रूजू होता यावं, यासाठी अधिवेशन आटोपशीर करून कामकाज संपविण्याची चर्चा आम्ही विरोधी पक्षनेत्यांसह केल्याचं उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी सांगितलं.

line

11 मार्च 2020- पुण्यात रुग्णांची संख्या पाचवर

दुबईहून पुण्यात परतलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील दोन प्रवासी काल कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे.

कोरोना

त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात 309 पैकी 289 जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

line

10 मार्च 2020 - कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण पुण्यात

पुणे शहरात दोन रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आल्याने राज्यात मंगळवारी सकाळी खळबळ उडाली होती. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

हे दोन्ही रुग्ण दुबईला एका ग्रुपसोबत फिरायला गेले होते. त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर या ग्रुपमधील महाराष्ट्रातल्या इतर नागरिकांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)