पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या आठ वर्षांच्या लिसिप्रियाचा काँग्रेसलाही टोला

फोटो स्रोत, @LICYPRIYAK
महिलादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सन्मान नाकारणाऱ्या लिसिप्रिया कंगुजमने काँग्रेस पक्षालाही फटकारलं आहे.
आठ वर्षीय लिसिप्रियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान प्रस्ताव नाकारला होता. त्यावर काँग्रेसने ट्वीट करून म्हटलं की, महिला सक्षमीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बेगडी प्रेम आणि पाखंडीपणाला पर्यावरण कार्यकर्ती लिसिप्रियाने खणखणीत उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव नाकारून लिसिप्रियाने दाखवून दिलं, की त्यांचं न ऐकणं कोणत्याही ट्वीटर मोहिमेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
यावर लिसिप्रिया म्हणते, "ठीक आहे. तुम्हाला माझ्याप्रती सहानुभूती वाटली. आता मुद्याला धरून बोलूया. सध्या सुरू असलेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनात तुमच्या पक्षाचे किती खासदार माझं म्हणणं सदनात मांडणार? तुम्हीही ट्वीटर कॅम्पेनसाठी माझ्या नावाचा उपयोग करू नये असं मला वाटतं. कोणी माझं ऐकतंय का?"
लिसिप्रियाला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं, "प्रिय लिसिप्रिया-तुझ्या म्हणण्यात आमचं म्हणणं सामावलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी शुद्ध हवेकरता वायूप्रदूषणाच्या निमित्ताने गोलमेज परिषद आयोजित करतो आहे. 2019 निवडणुकांपूर्वीही काँग्रेस पक्षाने पर्यावरणाचा मुद्दा उचलून धरला होता. आमच्या जाहीरनाम्यात हे मुद्दे स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत. आम्ही ते तडीस नेऊ"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
लिसिप्रियाने थरूर यांना उत्तर देताना म्हटलं आहे की, तुम्ही तातडीने प्रतिसाद दिलात याकरता तुमचे आभार. मात्र तुम्ही वायूप्रदूषणाचं उदाहरण देत माझ्या प्रश्नांना बगल देत आहात. तुमच्या माहितीसाठी सांगते, माझ्या तीन प्रमुख मागण्या आहेत- पहिली म्हणजे देशात हवामान बदलाचा कायदा पारित केला जावा (वायूप्रदूषण यामध्ये समाविष्ट असेल) दुसरी मागणी आहे देशभरातल्या सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात हवामान बदलाचा विषय समाविष्ट करण्यात यावा. तिसरी मागणी म्हणजे देशातल्या सगळ्या शालेय मुलांना उत्तीर्ण होण्यासाठी दहा झाडं लावणं अनिवार्य असावं.
लिसिप्रियाला थरूर यांनी उत्तर दिलं. "तुझ्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र काँग्रेस आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र मी आश्वासन देतो की संधी मिळताच संसदेत तुझ्या तिन्ही मागण्या नक्की मांडेन."

फोटो स्रोत, SHASHI THAROOR/FACEBOOK
लिसिप्रिया मणिपूरमध्ये कार्यरत आहे. पर्यावरणासंदर्भात तिचं काम सुरू आहे. गेल्या वर्षी लिसिप्रियाला आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
केंद्र सरकारने 8 मार्चला महिलादिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत प्रेरणादायी महिलांची वाटचाल मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिसिप्रियाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावर लिसिप्रिया म्हणाली होती, आदरणीय नरेंद्र मोदी. तुम्ही माझं म्हणणं ऐकणार नसाल तर माझ्या कामाचा उल्लेख करू नका. Sheinspiresus या मोहिमेअंतर्गत प्रेरणादायी महिलांच्या यादीत माझा समावेश केल्याबद्दल धन्यवाद. खूप विचार केल्यानंतर हा सन्मान नाकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. जय हिंद!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)