You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विद्या बाळ यांचे पुणे येथे 84 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या.
आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येतील.
विद्या बाळ या 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या संपादिका होत्या. 'मिळून साऱ्याजणी' मासिक सुरू करण्यापूर्वी त्यांनी 1964 ते 1983 या काळात त्यांनी 'स्त्री' मासिकाच्या साहाय्यक-संपादक होत्या.
1983 ते 1986 या काळात त्या मुख्य संपादक होत्या. त्यानंतर 1989 मध्ये त्यांनी 'मिळून साऱ्याजणी'ची सुरूवात केली.
1981 मध्ये विद्या बाळ यांनी स्त्रियांच्या समस्यांवर काम करण्यासाठी 'नारी समता मंचा'ची स्थापन केली. मिळून साऱ्याजणी या मासिकाशी संलग्न असणाऱ्या 'सखी मंडळा'ची स्थापनाही त्यांनी केली होती. केवळ स्त्री प्रश्नांवरच नाही तर विविध सामाजिक विषयांवरही या मंडळामार्फत चर्चा घडवून आणली जायची. 'बोलते व्हा,' 'पुरुष संवाद केंद्र,' 'अक्षरस्पर्श ग्रंथालय,' 'साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग' या संस्थाही त्यांनी सुरू केल्या.
एकट्या स्त्रियांसाठी परिषद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट्य, निदर्शने, परिसंवाद, 'दोस्ती जिंदाबाद,'सारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून घेतले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)