Chandra Grahan 2020: छायाकल्प चंद्रग्रहण पाहताना काय काळजी घ्याल?

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण हे 10 जानेवारी 2020 रोजी शुक्रवारी होत आहे. आज रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी या ग्रहणाची सुरुवात होईल आणि उद्या सकाळी 2.42 ला हे ग्रहण संपणार आहे. या ग्रहणाचा काळ 4 तासांचा राहील. हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसणार आहे.

हे पूर्ण चंद्रग्रहण नसून छायाकल्प चंद्रग्रहण असेल. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.

या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहणं होणार आहेत. त्यापैकी एक शुक्रवारी रात्री होणार आहे. तर उरलेली चंद्रग्रहणं 5 जून, 5 जुलै, 30 नोव्हेंबर आणि 14 डिसेंबर रोजी होतील.

जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे.

सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं असं तज्ज्ञ सांगतात. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)