पुणे येथे सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीची हत्या, बलात्काराचा संशय

बलात्कार, महिला
फोटो कॅप्शन, बलात्कार
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये सावत्र वडिलांनीच आपल्या 15वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सावत्र वडिलांवर हत्या आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं पाठवली आहेत.

आरोपी रिक्षाचालक असून त्याने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचाही संशय आहे. पीडित मयत मुलगी, तिची बहीण, आई आणि सावत्र वडील दापोडीत एकत्र राहत होते.

आरोपी आणि पीडितेच्या आईचा सातत्याने वाद होत असे. त्या वादाचा सूड म्हणूनही हा खून झाला आहे की नाही याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

गुरुवारी सायंकाळी पीडित मुलगी आणि तिचे वडील घरी होते. त्यांच्यात वाद झाला. याचं पर्यावसान खूनात झालं. आरोपीने मुलीचा तोंड दाबून, हाताने गळा दाबून खून केला असावा असं प्रथमदर्शनी दिसतं असं भोसरी पोलिसांनी सांगितलं.

निदर्शनं

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. घडलेल्या प्रकारानंतर आरोपी फरार आहे. पीडित मुलीची बहीण घरी आली असता घराला कुलूप होते. थोडावेळ वाट पाहून त्यांनी कुलूप तोडले तेव्हा हा प्रकार समोर आला.

आरोपीचा शोध सुरू आहे, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे असं भोसरी पोलिसांनी सांगितलं. आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे पशुवैद्यक तज्ज्ञ मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर मुंबईत 22 वर्षीय तरुणावर चालत्या कारमध्ये बलात्कार झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)