भीमा कोरेगाव : विजयस्तंभ परिसर बनला पोलीस छावणी; अभिवादनासाठी अलोट गर्दी

विजयस्तंभ
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भीमा-कोरेगावमध्ये गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या कडेकोट बंदोबस्तात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

भीमा-कोरेगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासूनच लोक दाखल होत आहेत. पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करत यावेळी 6500च्या आसपास पोलीस तैनात केल्याचं, सांगण्यात आलं. तसेच काहींवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. स्तंभापासून 1 किलोमीटर अंतरावर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गेल्या वर्षी भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

दरवर्षी 1 जानेवारीला हजारो दलित समाजातील लोक मोठ्या संख्येने भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तभांला भेट देतात. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिली होती.

1 जानेवारीला होणारी गर्दी लक्षात घेत यावेळी पोलिसांच्य बरोबरीने समता सैनिक दल आणि स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

विजयस्तंभ

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनांची पार्किंग आणि इतर व्यवस्था चांगली केल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली.

भीमा कोरेगावपासून एक किलोमीटरच्या अंतरावर राजकीय पक्ष आणि संघटनांना सभांसाठी परवानगी दिली आहे. याच ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा होणार आहे.

दम्यान भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात किंवा भीमा कोरेगाव येथे सभा घेण्यास कोर्टानं परवागनी नाकारली आहे. पण 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट देण्यापासून कोर्टाने आझाद यांना रोखलं नाहीये.

चंद्रशेखर

फोटो स्रोत, Getty Images

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा कोरेगावला सकाळी भेट दिली.

गेल्या वर्षी झालेला हिंसाचार लक्षात घेता पोलिसांनी 1200 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भीमा कोरेगावमध्ये येण्यास बंदी, तात्पुरत्या काळासाठी तडीपार असं कारवाईचं स्वरूप असल्याचं एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

गेल्यावर्षी 1 जानेवारी रोजी दगडफेक, जाळपोळ झाली होती. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मालमत्तेचंही अतोनात नुकसान झालं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)