इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, आधार-पॅन जोडण्याचीही मुदत वाढली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तेजाली शहासने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत सरकारने वाढवली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी कर परतावा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत या आधीच करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीसाठीही कर विवरणपत्र भरणाऱ्यांसाठी नवी तारीख 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. इतकच नव्हे तर आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2021 केली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?
ऑनलाईन प्राप्ती कर विवरण भरण्यासाठी तुम्हाला आधी https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागतं.
ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. एकदा तुम्ही यावर रजिस्टर झालात की तुमचे विवरण अगदी सहज घरबसल्या भरू शकता.
पण हो, हा वेब अॅड्रेस जरा निरखून पाहा, कारण अनेक खोट्या वेबसाईटही असाच काही पत्ता वापरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून याची ठळकपणे नोंद घ्या - https://www.incometaxindiaefiling.gov.in/

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
या वेबसाईटवर तुम्हाला तुम्ही यापूर्वी भरलेली विवरण पत्रं, तुमचा उद्गम कर आणि आयकर खात्यासंबंधित सर्व व्यवहारांची माहिती मिळू शकते.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
यावर रजिस्टर करताना 'individual' हा पर्याय निवडा. रजिस्टर करण्यासाठी तुमचा PAN क्रमांक तुमचा log-in ID असतो.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
लॉगइन केल्यावर तुम्ही इथे पोहोचता.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
आधीच्या वर्षांचे फाईल केलेले रिटर्न्स तुम्ही View Returns/ Form इथे पाहू शकता.
यात Filing of income tax return हा पर्याय निवडा.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षाचा सॅलरी रिटर्न भरण्यासाठी Assessment Year 2020-21 निवडा. ज्या वर्षाचा रिटर्न भरतो त्या वर्षाला previous year म्हणतात.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
सॅलरी अर्थात वेतन हा एकमेव मुख्य उत्पन्न स्रोत असलेल्यांना, एक घर, इतर उत्पन्न आणि एकूण उत्पन्न पन्नास लाखांपर्यंत असणाऱ्यांचं विवरणपत्र भरण्यासाठी ITR-1 हा फॉर्म वापरला जातो. तो कसा भरायचा ते जाणून घेऊ.
आता तुम्हाला स्क्रीन अशी दिसेल.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
यात तुम्ही तपशील ऑनलाईन भरून रिटर्न फाईल करू शकता अथवा तपशील भरल्यानंतर PDF ची प्रिंट घेऊन बंगलोरला पोस्टाने पाठवू शकता.
ऑनलाईन फाईल करण्यासाठी विवरण पत्र (Income tax return) 'e-verify' करणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
XML हा पर्याय निवडला तर तुम्ही ITR 1 फॉर्म डाउनलोड करून नंतर ती फाईल वेबसाईटवर अपलोड करू शकता.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
सर्व माहिती हाताशी असेल तर फॉर्म ऑनलाईन भरणं सोयीस्कर ठरतं.
आधीच्या वर्षांत तुम्ही रिटर्न भरले असेल तर तोच तपशील तुम्हाला या वर्षीच्या रिटर्नसाठी वापरता येऊ शकतो. यासाठी यातील योग्य ते रकाने निवडा.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
आता तुम्हाला असं दिसेल. यात तुमचं नाव आणि इतर माहिती भरा. आधार क्रमांक लिहिणे अत्यावश्यक आहे.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
या वर्षाचा रिटर्न पहिल्यांदाच भरत असाल तर 'original' हा पर्याय निवडा. फाईल केलेल्या रिटर्नमध्ये दुरुस्ती करायची असल्यास 'revised' हा पर्याय वापरून तुम्ही दुरुस्ती करू शकता.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
यानंतर दुसरं पान तुम्हाला असं दिसतं. यात तुमचा पगार, निरनिराळे भत्ते, बचत, विमा, इ माहिती भरावी. पगारासंबंधी माहिती तुमच्या Form 16 मधून तुम्हाला मिळेल.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
पगाराची एकूण रक्कम, निरनिराळे भत्ते, फायदे वगळून भरावी. साधारणत: ही रक्कम 'Income chargeable under salary' असते.
त्यात इतर फायदे, भत्ते मिळून 'Gross Salary' बनते.
House property या भागात तुम्हाला मिळालेले घरभाडे, घरावर झालेल्या खर्च, घरपट्टी, घराची किंमत इ. तपशील भरावा लागतो.
Deductions म्हणजेच वजावट. याअंतर्गत तुम्ही आयुर्विमा, प्रॉव्हिडंट फंड, SIP, गृहकर्जाचे व्याज, बचत खात्यावर मिळालेले व्याज, देणग्या, घरभाडे इत्यादीची वजावट मिळवू शकता.
Income from other sources मध्ये तुम्हाला बँकेकडून मिळालेले व्याज, लॉटरी, बक्षिसं, हातउसने दिलेल्या पैशांवर मिळालेले व्याज इ. ची एकूण रक्कम भरावी.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
तिसऱ्या पानावर तुमच्या उद्गम कर अर्थात TDS संबंधित तपशील असतो. पगारातून कापला गेलेला उद्गम कर, बॅंक किंवा इतर संस्थांनी कापलेला उद्गम कर तसंच तुम्ही घरभाडे किंवा इतर देयके यातून कापलेला उद्गम कर याची माहिती यात दिसते.
जर काही तपशील तिथे दिसत नसेल तर तुमच्याकडील TDS सर्टिफिकेट्सच्या आधारे तुम्ही यात भरू शकता. तुमच्या एकूण TDS ची माहिती तुम्हाला Income taxच्या वेबसाईटवरही मिळू शकते.
गेल्या वर्षाचा TDS क्लेम केला नसेल तर तोही या वर्षांत तुम्ही वापरू शकता.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
चौथ्या पानावर, वर्षभरात तुम्ही भरलेल्या एकूण टॅक्सची माहिती दिसते. तुमचे एकूण कर देयक, वर्षभरात भरलेला प्राप्तीकर (advance tax), आणि त्यानुसार कर बाकी अथवा परतावा इथे दिसतो.
शेतकी उत्पन्न (5000 पेक्षा कमी) आणि डिव्हिडंड, याचा तपशील इथे द्यावा.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
खाली 'E' भागात, ज्या बँक खात्यात तुम्हाला परताव्याची रक्कम हवी आहे त्याचा क्रमांक आणि इतर माहिती भरावी. Verification मध्ये रिटर्न स्वतः भरत असाल तर 'self' हा पर्याय निवडा. ही सर्व माहिती भरताना save करत राहा.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
पाचव्या पानावर 80G अंतर्गत तुम्ही दिलेल्या देणग्यांची नोंद करावी. यासाठी त्या त्या संस्थेचा पॅन क्रमांक, पिन कोड आदी माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे; अन्यथा त्याची वजावट मिळत नाही.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
संपूर्ण माहिती भरल्यानंतर Preview and Submit हा पर्याय निवडा.

फोटो स्रोत, Shttps://www.incometaxindiahrikant Fakirba Bangale

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
आता तुम्हाला असं दिसेल. यातील सर्व मजकूर नीट तपासा. काही बदल करायचे असतील तर त्या पानावर जाऊन बदल करून घ्या.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
तुमच्या इतर बॅंक खात्यांची माहिती येथे लिहा. इथे D13 आणि D14 येथे तुम्हाला तुमचे कर देयक (tax payable) किंवा करपरतावा (tax refund) कळेल.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
पानाच्या सर्वांत खाली उजव्या बाजूला 'Click here to download the Preview PDF' यावर क्लिक करून तुमचा रिटर्न डाउनलोड करू शकता. सर्व तपासून नंतर 'Submit' हे बटण दाबा.

फोटो स्रोत, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
रिटर्न ऑनलाईन जमा होण्यासाठी e-verify करण गरजेचं आहे. तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खात्याचा क्रमांक वापरून रिटर्न e-verify करता येतो. तसं करायचं नसेल तर प्रिंट काढून बंगलोरला पाठवता येतो. रिटर्न फाईल केल्यानंतर त्याची पावती (ITR-V) तुमच्या इमेल वर पाठवली जाते.
हेही नक्की वाचा -
हेही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)