नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा

नायबसिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, मनोहर खट्टर यांचा राजीनामा

फोटो स्रोत, @BjpBiplab

Published

मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती हरियाणाचे मंत्री कंवर पाल गुर्जर यांनी दिली आहे. आता नायब सिंह सैनी यांची हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.

खट्टर यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनीही त्यांच्या पदांचे राजीनामे राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

राजीनामा देण्यापूर्वी मनोहर लाल खट्टर भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी चंदिगढमधील हरियाणातील निवासस्थानी पोहोचले होते.

याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये खट्टर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

संध्याकाळी सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ राज्यपालांकडून घेतली. त्यांच्या 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामध्ये पुढील मंत्र्यांचा समावेश आहे.

  • कंवर पाल सिंह गुर्जर
  • मूलचंद शर्मा
  • रणजीत सिंह चौटाला
  • जयप्रकाश दलाल
  • डॉ. बनवारी लाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन सैनी यांचं अभिनंदन केलं आहे.

कोण आहेत नवे मुख्यमंत्री?

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार नायब सिंह सैनी हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून त्यांचं एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलंय.

54 वर्षीय सैनी यांच्या भाजपमधील राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1996 पासून सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी हरियाणा भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी काम केलं. 2000 सालापर्यंत ते हरियाणाच्या प्रदेश सरचिटणीस सोबत काम करत होते.

कोण आहेत नवे मुख्यमंत्री?

फोटो स्रोत, ANI

ते 2002 मध्ये अंबाला येथील भाजप युवा आघाडीचे जिल्हा सरचिटणीस झाले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांची अंबाला येथे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

2014 मध्ये नारायणगड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. पुढे 2016 मध्ये त्यांची हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती झाली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, नायब सिंह सैनी यांनी कुरुक्षेत्र मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निर्मल सिंग यांचा 3.83 लाख मतांच्या फरकाने पराभव केला.

सैनी 2014 साली पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतर लगेचच मंत्रीही बनले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

हरियाणात भाजप आणि जेजेपीची युती तुटू शकते अशीही चर्चा आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जेजेपीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले.

मनोहर लाल खट्टर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोहर लाल खट्टर

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते आणि हरियाणा सरकारचे मंत्री कंवर पाल गुर्जर यांनी राजीनाम्याची पुष्टी केली आहे.

ते म्हणाले, "माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे."

त्यांना पुढच्या मुख्यमंत्र्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "सीएम एकदम ठीक आहेत. सीएम साहेबच पुढचे सीएम राहतील."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत भाजपचे 41 आमदार असून त्यांना आमदार गोपाल कांडा यांच्यासह 5 अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपसोबत युती असलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) 10 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 30 आमदार आहेत.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)