अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा राहत्या घरी बाथरूममध्ये सापडला मृतदेह

आदित्य सिंग राजपूत

फोटो स्रोत, Facebook/Aditya Singh Rajput

फोटो कॅप्शन, आदित्य सिंग राजपूत
Published

अभिनेता आदित्य सिंग राजपूत याचं निधन झालं आहे. मुंबईतील अंधेरी भागात आदित्य राहत होता.

राहत्या घरी बाथरूममध्ये आदित्यचा मृतदेह आढळला. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आदित्य बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. मात्र, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

अभिनय, मॉडेलिंग आणि कास्टिंग कोऑर्डिनेशन अशा क्षेत्रात त्यानं काम केलं होतं.

आदित्यनं मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. क्रांतिवीर, मैंने गांधी को नहीं मारा यांसारख्या सिनेमातून त्यानं काम केलं आहे.

स्प्लिट्सविल्ला 9 सारख्या रिअॅलिटी शोमध्ये आदित्य दिसला होता. तसंच, लव्ह, आशिकी, कोड रेड, आवाज सीझन 9, बॅड बॉय सीझन 4 यांसाख्या टीव्ही मालिकांमध्येही आदित्यनं काम केलं होतं.

मुंबईतील मालिका, जाहिरात, मॉडेलिंग आणि सिनेमा जगतात आदित्य बऱ्यापैकी प्रसिद्ध होता.

हे वाचलंत का?