You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शेतकऱ्याला प्रगतीचा चान्सच नाही'
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशातील पावसाचा पॅटर्न बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रात तर ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान झालं आहे. बेभरवशाच्या पावसामुळे शेतातून मिळणाऱ्या एकरी उत्पादनात घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत.
जे शेतकरी पूर्वी एका एकरात 25 क्विंटल कापूस घ्यायचे, त्यांना आता केवळ 5 क्विंटल उत्पादन होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचं शेतातून मिळणारं उत्पन्न कमी व्हायला लागलं आहे आणि सोबतच त्यांचं आर्थिक गणितही कोलमडलं आहे.
दुसरीकडे, हवामान बदलाच्या काळात तग धरू शकतील अशी पीक पद्धत आता विकसित करावी लागणार असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार, अमोल लंगर
एडिट – निलेश भोसले