बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

सिद्धारामय्या

फोटो स्रोत, @TWITTER

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. सिद्धारामय्या यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी निवड, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू होती

डीके शिवकुमार की सिद्धरामय्या या दोन नावांभोवती निवडणूक निकालानंतरचं कर्नाटकचं राजकारण फिरत होतं.

अखेर मुख्यमंत्रीपदी सिद्धारामय्या यांची निवड झाली आहे. काँग्रेस नेते के.वेणुगोपाल यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांची निवड झाली आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकशाही पद्धतीने गटनेता म्हणून सिद्धारामय्या यांची निवड केली हे अतिशय स्पष्ट आहे.

पण किती आमदार त्यांच्या बाजूने होते आणि डीके शिवकुमार यांच्या बाजूने किती आमदार होते हे मात्र काँग्रेसने स्पष्ट केलं नाही.

2. शुबमन गिलचं पहिलंवहिलं आयपीएल शतक

शुबमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

शुबमन गिलने अहमदाबाद इथे सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध आयपीएल स्पर्धेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं.

शुबमन गिल हा गुजरात टायटन्स संघातर्फे शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. 23व्या वर्षी शुबमनच्या गिलच्या नावावर टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 तसंच आयपीएल स्पर्धेत शतक नावावर आहे.

शुबमनने 58 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 101 धावांची खेळी केली. टी.नटराजनच्या चेंडूवर एक धाव घेत गिलने आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली.

धडाकेबाज युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद इथे द्विशतक साजरं केलं. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचत शुबमनने द्विशतकाला गवसणी घातली.

वनडेत द्विशतक झळकावणारा शुबमन सगळ्यात लहान वयाचा फलंदाज ठरला.

शुबमनने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.

3. स्मार्टफोनमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय का?

अगदी कोवळ्या वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल किंवा त्याला डिजिटल जगाची ओळख होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय.

हे मत आहे अमेरिकन स्वयंसेवी संस्था 'सेपियन लॅब्स'चं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

ही संस्था 2016 पासून लोकांचं मानसिक आरोग्य समजून घेण्यावर भर देत आहे.

कोव्हीडच्या काळात दूरस्थ (ऑनलाईन) शिक्षण सुरू झालं. याच दरम्यान एक चर्चा सुरू झाली की, लहान मुलांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम किती असावा?

त्यांनतर याच्या फायदया- तोट्यांवर चर्चा सुरू झाली. त्याचवेळी सोशल मीडियावरही व्हीडिओंचा पूर येऊ लागला होता.

4. उष्णतेची लाट : समुद्राचं तापमान वाढतंय, आपल्याला याचा काय धोका?

मे महिना म्हणजे भारतात उन्हाचा तडाखा, हे समीकरण नवं नाही. पण मोखा चक्रीवादळाने यात आणखी भर घातली.

या वादळानं बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीला झोडपून काढलंच, पण या वादळाच्या प्रभावाखाली बदललेल्या वाऱ्यांमुळे भारताच्या मुख्य भूमीवर मात्र तापमानाचा पारा आणखी वर चढला.

ऊन

फोटो स्रोत, Getty Images

भारतात अनेक ठिकाणी पारा 40-42 च्या वर गेलाय, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. पण अशा उष्णतेच्या लाटा समुद्रातही येतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही समुद्रकिनारी राहात असाल-नसाल, तरी या सगळ्याचा तुमच्या जगण्यावर आणखी परिणाम होऊ शकतो.

5. कृत्रिम साखर खाऊ नका, असं WHOने सांगितलं आहे, कारण -

डायबिटीस, मधुमेह, साखर – नावं अनेक, पण आजार एक. आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो.

आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत.

कृत्रिम साखर

फोटो स्रोत, Getty Images

पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. सोमवारी म्हणजेच 15 मेला जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने एक अहवाल जारी करत म्हटलंय की कृत्रिम साखर (non-sugar sweeteners) वापरल्याने प्रौढांमध्ये किंवा मुलांमध्ये शरीरातली चरबी कमी करण्यास मदत होत नाही.

उलट या कृत्रिम साखरेच्या वापराचे दीर्घकालीन दुष्परिणाम असू शकतात, जसं की टाईप 2 डायबेटीस, हृदयविकार आणि मृत्यूचा धोका लोकांना जास्त असू शकतो, असंही WHOने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)