You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरला
आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरला
Published
वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून मथुरेला नेला. कारण काय? तर तिने आंतरजातीय विवाह केला.
20 वर्षांच्या आयुषी यादवला गोळी झाडत वडील नितेश कुमारने तिची हत्या केली. येत्या 1 डिसेंबरला आयुषीनं तिचा विसावा वाढदिवस साजरा केला असता.
मात्र वाढदिवसाच्या 9 दिवसांपूर्वीच 21 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मथुरा पोलिसांच्या उपस्थितीत आयुषीला अग्नि देण्यात आला.