‘ही लोकशाही नाहीये’, काळे कपडे घालून सरकारचा निषेध, प्रियंका गांधी म्हणतात...

‘ही लोकशाही नाहीये’, काळे कपडे घालून सरकारचा निषेध, प्रियंका गांधी म्हणतात...
Published

‘ही लोकशाही नाहीये’, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

संसदेत काळे कपडे घालून विरोधकांनी सरकारचा निषेध केला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी 21 जुलै रोजी आधी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

बीबीसीचे प्रतिनिधी पवनकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना छत्रसाल स्टेडियमवर नेण्यात आलं होतं.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

राहुल गांधी यांच्यासोबत अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)