You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेदांत श्रीवास्तवने 12 वीच्या गुणांवर प्रश्न उपस्थित केले; CBSE ने चूक मान्य केली, नेमकं प्रकरण काय?
वेदांत श्रीवास्तवने 12 वीच्या गुणांवर प्रश्न उपस्थित केले; CBSE ने चूक मान्य केली, नेमकं प्रकरण काय?
Published
CBSE बोर्डाचा बारावीतला विद्यार्थी वेदांत श्रीवास्तवची फिजिक्सची उत्तरपत्रिका देशभरात चर्चेचा विषय ठरली.
कारण कमी मार्क पडल्यावरून वेदांतने फेरतपासणीसाठी अर्ज केल्यावर कळलं की त्याच्या उत्तरपत्रिकेची डाऊनलोड केलेली स्कॅन कॉपी मुळात त्याची नसून दुसऱ्या कुणाचीच आहे.
याबद्दल सोशल मीडियावर सविस्तर लिहिल्यावर अनेकांनी वेदांतला पाठिंबा दिला, तर काहींनी ट्रोलही केलं. काहींनी त्याला 'देशविरोधी'ही म्हटलं.
मात्र या प्रकरणात आता CBSE ने स्वतःची चूक मान्य करत वेदांतला त्याची योग्य उत्तरपत्रिका पाठवल्याचं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)