You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माकडाच्या पिल्लानं पाणी पिण्यासाठी तांब्यात डोकं घातलं आणि तीन दिवस अडकलं
तहान लागल्यावर माकडाच्या पिल्लाने पाणी पिण्यासाठी तांब्यात डोकं घातलं, पण तो तांब्या डोक्यात घट्ट अडकला. आणि अडकला तर असा की तीन दिवसानंतर त्याची त्यातून सुटका करण्यात आली.
ही घटना जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातील डोणगावची आहे.
प्राणीमित्र समाधान गिरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात तांब्या अडकलाय, हे दुसऱ्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं. तीन दिवसांपासून त्याच्या डोक्यात तो तांब्या तसाच होता."
त्या पिलाची आई त्याला तशाच अवस्थेत घेऊन झाडावरून फिरत होती. अस्वस्थ झालेल्या त्या पिलाला पकडण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी करत होते, पण इतर माकडं लोकांच्या अंगावर धावून येत असल्यामुळे कुणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं. त्यानंतर प्राणीमित्र समाधान गिरी यांना बोलावण्यात आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)