उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे : एकमेकांसमोर 13 जागा लढले, कोण किती जिंकले?

शिवसेना, लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निकालाकडे लागलं होतं. ही उत्सुकता महाराष्ट्रानं खरी ठरवली. कारण महाराष्ट्राचे निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरलं.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश मिळवलंय. काँग्रेस 13 जागांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही उल्लेखनीय कामगिरी केलीय.

त्याचवेळी शिवसेनेतल्या बंडानंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पहिली मोठी निवडणूक झाली.

दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं.

मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करत आले आहेत की, ‘खरी शिवसेना’ आमचीच आहे.

या निवडणुकीतल्या निकालानं 'शिवसैनिक' कुणाच्या बाजूनं आहेत, हे प्रथमदर्शिनी दाखवून दिलं आहे.

हे पाहण्यासाठी जावास्क्रिप्ट असलेला मॉडर्न ब्राऊजर आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.

निकाल लागण्याची प्रतीक्षा
जिंकण्यासाठी 272 जागांची आवश्यकता
निकाल लागण्याची प्रतीक्षा
पेज अपडेट करण्यासाठी रिफ्रेश करा

शिंदे आणि ठाकरे गट किती जागा लढतायेत?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत आहे. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट आणि भाजपही आहे. भाजपच्या वाट्याला महायुतीत जास्त जागा आल्या होत्या.

त्यामागोमाग एकनाथ शिंदेंच्याच पक्षाला जागा मिळाल्या होत्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील 48 पैकी 15 जागा लढले.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा भाग होती. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे.

महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्यालाच आल्या होत्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढली.

महाराष्ट्रातील 13 जागांवर ‘शिंदे वि. ठाकरे’ लढत

महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहे, जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी बालेकिल्लेसदृश होते. त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचं लक्ष होतंच. मात्र, महाराष्ट्रातील इतर जागांवरही, जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार होती आणि अपेक्षेप्रमाणे तिथेही चुरशीचा सामना रंगलेला दिसून आला.

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना, लोकसभा निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता आपण महाराष्ट्रातील ‘शिंदे विरुद्ध ठाकरे’ लढतीची सविस्तर यादी पाहूया.

1) उत्तर पश्चिम मुंबई

रवींद्र वायकर (शिवसेना) - विजयी

अमोल कीर्तीकर (ठाकरे गट) - पराभूत

(दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील निकाल वादाच्या केंद्रस्थानी सापडलाय. इथे वायकर 48 मतांनी जिकले असले, तरी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की, ते या निकालाला आम्ही आव्हान देण्याचा विचार करतोय.)

2) दक्षिण मध्य मुंबई

राहुल शेवाळे (शिवसेना) - पराभूत

अनिल देसाई (ठाकरे गट) - विजयी

3) दक्षिण मुंबई

यामिनी जाधव (शिवसेना) - पराभूत

अरविंद सावंत (ठाकरे गट) - विजयी

4) बुलडाणा

प्रतापराव जाधव (शिवसेना) - विजय

नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) - पराभूत

5) यवतमाळ

वाशिम - राजश्री पाटील (शिवसेना) - पराभूत

संजय देशमुख (ठाकरे गट) - विजयी

6) हिंगोली

बाबूराव कदम (शिवसेना) - पराभूत

नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) - विजयी

7) औरंगाबाद

संदिपान भुमरे (शिवसेना) - विजयी

चंद्रकांत खैरे (ठाकरे गट) - पराभूत

8) नाशिक

हेमंत गोडसे (शिवसेना) - पराभूत

राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) - विजयी

9) शिर्डी

सदााशिव लोखंडे (शिवसेना) - पराभूत

भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) - विजयी

10) मावळ

श्रीरंग बारणे (शिवसेना) - विजयी

संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) - पराभूत

11) कल्याण

श्रीकांत शिंदे (शिवसेना) - विजयी

वैशाली दरेकर (ठाकरे गट) - पराभूत

12) ठाणे

नरेश म्हस्के (शिवसेना) - विजयी

राजन विचारे (ठाकरे गट) - पराभूत

13) हातकणंगले

धैर्यशील माने - विजयी

विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट) - पराभूत