बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

महिला

फोटो स्रोत, Getty Images

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपलं वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...

1. कोरोना, H3N2 फ्लू आणि अ‍ॅडिनो व्हायरस यांमध्ये काय फरक आहे?

ताप, खोकला, घशात खवखव... तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणाला, विशेषतः लहान मुलांना अशी लक्षणं जाणवतायत का? असेल, तर हा लेख जरूर वाचा. कारण सध्या अनेक ठिकाणी एक नाही, दोन नाही तर तीन वेगवेगळ्या विषाणूंची साथ दिसून येते आहे.

गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय.

याशिवाय देशात काही ठिकाणी अ‍ॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. लहान मुलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आहे.

पण हा अ‍ॅडिनोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएन्झापेक्षा किती वेगळी आहेत? तिन्ही व्हायरसपासून संरक्षणासाठी काय करावं? जाणून घेऊया.

ईद

फोटो स्रोत, Getty Images

2. रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?

यंदाचा ईद उन्हाळ्यात कशी काय आली, याचा विचार तुमच्या मनात आला का? किंवा याआधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल.

त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.

कँपा कोला

फोटो स्रोत, CAMPA COLA

3. कँपा कोला : इतिहासाच्या फ्रिजरमधून अनेक दशकांनंतर पुनरागमन, अशी आहे जुनी कहाणी

राजधानी दिल्लीच्या कनॉट प्लेसच्या शंकर मार्केटकडून तुम्ही जेव्हा फायर ब्रिगेड लेनकडे पुढं जाता तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोडकळीस आलेली इमारत (कारखाना) पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या इमारतींच्या भिंतीवर आजही कँपा कोला लिहिलेलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशाच्या सॉफ्ट ड्रिंकच्या (शीत पेय) बाजारपेठेत हात आजमावण्यासाठी कंबर कसलीये. दुसरीकडे, त्याचवेळी या इमारतीचा परिसर मात्र आजही तसाच सामसूम आहे.

एके काळी इथं कायम कँपा कोलाच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी गाड्यांच्या रांगा लागलेल्या असायच्या.

या इमारतीच्या मेन गेटबाहेर लक्झरी कारची गर्दी झालेली पाहायला मिळायची. या गाड्यांचे ड्रायव्हर त्या स्वच्छ करत असल्याचं अनेकदा दिसायचं. वाचा कँपा कोलाची संपूर्ण कहाणी..

व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

4. रशिया-युक्रेन संघर्ष : युद्ध गुन्ह्यांसाठी पुतिनविरोधात अटक वॉरंट, या गुन्ह्यांची सुनावणी कुठे होते?

पुतिन यांना न्यायालयानं युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरवलं असून, युक्रेनमधून रशियात लहान मुलांना अवैधरित्या निर्वासित करण्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

24 फेब्रुवारी 2022 पासून म्हणजे रशियानं युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यापासूनचे हे गुन्हे असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

रशियानं मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच, या आरोपांना रशियानं 'अपमानकारक' म्हटलंय.

मात्र, यातून फार काही साध्य होईल असं दिसत नाहीय. कारण आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाकडे संशयिताला अटक करण्याचे अधिकार नाहीत. शिवाय, ते त्यांचा अधिकार ICC च्या सदस्य देशांमध्येच वापरू शकतात आणि रशिया ICC चा सदस्य नाहीय.

मात्र, पुतिन यांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यामुळे अडचणी येऊ शकतात.

अमृतपाल सिंग

फोटो स्रोत, Getty Images

5. अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तानविषयी त्याचं मत काय आहे आणि पंजाबमध्ये नेमकं काय होईल?

अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहे. पण हा अमृतपाल कोण आहे?

स्वतःला धर्मप्रचारक म्हणवून घेणाऱ्या अमृतपाल सिंगला अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचे फुटिरतावादी विचार यांमुळे पंजाबचं वातावरण ढवळून निघालं आहे.

आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता.

त्यानंतर अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्याचे पडसाद पंजाबमध्ये उमटू लागले.

अगदी लंडनमध्येही अमृतपाल सिंगच्या कथित समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)