ममीला गर्लफ्रेंड म्हणून सोबत बाळगत होता, पोलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांना डिलिव्हरी बॉयकडे ममी सापडली

फोटो स्रोत, Reuters

Published

दारू प्यायल्याचं भासवत पुरात्त्वविभागाच्या एका जागेवर तो घुसला... पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याजवळच्या बॅगेत जे मिळालं ते पाहून पोलीसही चक्रावले.

तो चक्क एक ममी घेऊन हिंडत होता. अर्थात, ममी इतरांसाठी... त्याच्यासाठी ती त्याची 'गर्लफ्रेंड' होती.

ही विचित्र घटना पेरूमधली आहे. पोलिसांनी कूलर बॅगमधून ममी घेऊन फिरणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.

बँडेजमध्ये गुंडाळलेल्या ममीसोबत आपण एकाच खोलीत राहात असल्याचं त्यानं सांगितलं आणि या ममीला तो त्याची ‘स्पिरिच्युअल गर्लफ्रेंड’ मानत होता.

त्याने आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी म्हणून ही ममी बॅगेत ठेवली होती.

या ममीला त्याने प्रेमाने ‘हुआनिता’ असं टोपणनाव ठेवलं होतं. त्याने ममी एका बॉक्समध्ये टीव्हीशेजारी ठेवली होती.

ही ममी आपल्या वडिलांकडे असल्याचं या डिलिव्हरी बॉयने सांगितलं, पण त्याच्या वडिलांनी ती नेमकी कशी मिळाली याबद्दल काहीही माहिती दिली नाही.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ममी 600 ते 800 वर्षं जुनी आहे. पण या डिलिव्हरी बॉयला वाटत होती त्याप्रमाणे ती बाईची नव्हती, तर एका प्रौढ पुरूषाची होती.

या पुरूषाचं वय मृत्यूच्या वेळी 45 वर्षं असावं आणि उंची 4 फूट 11 इंच असावी, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

ही ममी बँडेजमध्ये लपेटून भ्रूणाच्या अवस्थेत ठेवण्यात आली होती. पूर्व हिस्पॅनिक काळात मृतदेह पुरण्याची ही सर्वसाधारण पद्धत होती.

पेरूमध्ये स्पॅनिश येण्याच्या आधीपासून मृतदेह पुरताना ‘ममीफिकेशन’ केलं जायचं. महत्त्वाच्या उत्सवांदरम्यान यांपैकी काही ममी बाहेर काढून मिरवल्या जायच्या.

पोलिसांनी कूलर बॅगमधली ममी ताब्यात घेतली आणि पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे दिली.

ही ममी घेऊन फिरणारा कुरिअर बॉय आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)