आधी नाणार, आता बारसू – कोकणातल्या रिफायनरीचा वाद नेमका काय? सोपी गोष्ट 842
2015मध्ये पहिल्यांदा कोकणात एका मोठ्या रिफायनरीचा प्रस्ताव आला. ही 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी' असेल, अशी घोषणा करण्यात आली.
पण या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. या प्रकल्पाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा कोकणात निसर्गाचा ऱ्हास होईल, मच्छीमारांचं नुकसान होईल, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली.
नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा प्रकल्प रत्नागिरीमधल्याच बारसूमध्ये होईल, अशी घोषणा केली. आता तिथेही लोक रस्त्यावर उतरलेत.
काय आहे हा रिफायनरीचा प्रकल्प? या प्रकल्पाची गरज काय? आणि त्याला एवढा विरोध का होतोय? समजून घेऊ या सर्व बाजू आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



