‘माझ्या मुलीच्या दिसण्यावर का जाता, टॅलेंटकडे पाहा’; अमरावतीच्या भारती फुलमाळीचे आईवडील काय म्हणाले?
‘माझ्या मुलीच्या दिसण्यावर का जाता, टॅलेंटकडे पाहा’; अमरावतीच्या भारती फुलमाळीचे आईवडील काय म्हणाले?
Published
अमरावतीच्या भारती फुलमाळीनं तब्बल सात वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. इंग्लंडमध्ये महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीच्या संघात तिचा समावेश आहे.
या स्पर्धेआधी सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला हरवलं, त्यात भारतीनं अर्धशतक ठोकत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी विमेन्स प्रीमियर लीगमध्येही तिनं चमकदार कामगिरी बजावली होती.
पण एवढं यश मिळवूनही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. भारतीच्या या वाटचालीविषयी तिच्या आई-वडिलांना काय वाटतं? बीबीसी मराठीनं जाणून घेतलं.
रिपोर्टर - नितेश राऊत
कॅमेरा - पूर्ण बोरसे
प्रोड्यूसर - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






