ईशानच्या द्विशतकामुळे भारताचा बांगलादेशवर 277 धावांनी 'विराट' विजय

ईशनच्या द्विशतकामुळे भारताचा बांगलादेशवर 277 धावांनी 'विराट' विजय

फोटो स्रोत, Getty Images

Published

बांगलादेशविरोधातील तिसरा एकदिवसीय सामना भारताने 277 धावांनी जिंकला आहे. भारताने ईशान किशनच्या 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या मदतीने 409 धावा केल्या होत्या.

मात्र बांगलादेशचा संघ 182 धावांमध्येच तंबूत परतला. 

बांगलादेशच्या तस्कीन अहमद, इबादत हुसैन, शाकीब अल हसन यांनी 2-2 विकेट घेतल्या तर मुस्तफिजुर रहमान आणि मेंहदी हसन यांनी प्रत्येक 1 विकेट घेतली. 

इशान किशन

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशतर्फे खेळताना शाकीब अल हसनने सर्वाधीक 43 धावा केल्या तर कर्णधार लिटन दासने 29, यासिर अलीने 25 आणि महमदुल्लाहने 20 धावा केल्या.

आता दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील. यातील पहिली कसोटी चितगांव येथे 14-18 डिसेंबरमध्ये तर मिरपूर येथे दुसरी 22-26 या काळात खेळवली जाईल. 

बांगलादेशविरुद्ध ईशान किशननं झळकावलं द्विशतक

भारतीय संघाचा सलामीवर सलामीवीर ईशान किशननं बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावलं आहे. त्याचं हे वनडेतील पहिलं द्विशतक आहे.

यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन चौथा भारतीय तर सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. याआधी हिटमॅन रोहित शर्माने 3 तर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी एक द्विशतक झळकावलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या तिघांव्यतिरिक्त ख्रिस गेल,मार्टिन गप्तील,फखर झमन यांच्या नावावर द्विशतक आहे.

वनडे क्रिकेटमधलं हे दहावं वैयक्तिक द्विशतक आहे.

आयपीएल स्पर्धेत गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटी रुपये खर्च करून इशानला ताफ्यात समाविष्ट केलं होतं.

भारताचा सलामीवीर ईशान किशनने बांगलादेशविरुद्ध 210 धावांची खेळी केली आहे. त्याचं हे वनडेतील पहिले द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम इशाननं आपल्या नावावर केला आहे. इशानने आपल्या खेळीत 131 चेंडूंमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याला तस्किन अहमदनं बाद केलं.

ईशानचं हे वनडेतील पहिले द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम ईशाननं आपल्या नावावर केला आहे. ईशानने आपल्या खेळीत 131 चेंडूंमध्ये 24 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याला तस्किन अहमदनं बाद केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)