यवतमाळमध्ये पावसाचा जोर, पुरात अडकलेल्या लोकांसाठी थेट हेलिकॉप्टरची मदत

यवतमाळमध्ये पावसाचा जोर, पुरात अडकलेल्या लोकांसाठी थेट हेलिकॉप्टरची मदत
Published

यवतमाळ जिल्ह्यातील गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. गावांचा संपर्क तुटल्याने पुरात फसलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आलीय. तर आणखी काही ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे इथल्या पुष्पावती नदीला पूर आला आहे. या प्रदेशातील इतर नद्यांच्या पाणीपातळीतही प्रचंड वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याने यवतमाळ आणि जवळपासच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)