You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंचे पुत्र अमित यांच्या मनात कोणत्या घटनेमुळं 'काका' उद्धव विषयी कटुता आली?
शिवसेना भवन, शिवाजी पार्क, बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान अशी महत्त्वाची ठिकाणं असणारा शिवसेनेचा बालेकिल्ला माहिम विधानसभा मतदारसंघातली लढत महत्त्वपूर्ण असणार आहे.
कारण, या मतदारसंघातून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अमित ठाकरेंची ही पहिलीच निवडणूक आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजप आणि शिंदे गटाकडूनही प्रयत्न झाले. पण सरवणकर त्यांच्या भूमिकेवर राहिले असून, त्यांनी अर्जही मागे घेतला नाहीय.
अशात माहिममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल. या निवडणुकीसाठी राज ठाकरे किती सज्ज आहेत?
पाहा मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.