सोनम वांगचूक उपोषण, संसदेवरच्या मोर्चाबद्दल अभिजीत दिपके काय म्हणाले?

सोनम वांगचूक उपोषण, संसदेवरच्या मोर्चाबद्दल अभिजीत दिपके काय म्हणाले?
Published

आज (16 जुलै) कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 26 वा दिवस तर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली असून त्यांचं वजन नऊ किलोंनी घटलेलं आहे.

या पार्श्वभूमीवर, सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडावं, यासाठीची मागणी देशभरातून मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. दुसऱ्या बाजूला, या आंदोलनाबाबत खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

'राहुल गांधी यांनी उपोषणाला पाठिंबा द्यावा की न द्यावा?', 'हे आंदोलन संघाकडून चालवलं जात आहे किंवा संघाकडून वापरलं जात आहे का?', 'आमिर खानने या आंदोलनाला पाठिंबा का दिला नाही?'

या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)