You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धाराशिव, बीड, लातूर मध्ये भयंकर पूर; नागरिकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केले
बीड, धाराशिव येथे रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पशूधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. सध्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून धाराशिवमध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. रविवारी (21 सप्टेंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तातडीने धाव घेतली आहे.
आतापर्यंत अनेक कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी अजूनही काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.