बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. आराध्या बच्चनशी संबंधित व्हीडिओवरून यूट्यूबला कोर्टाने म्हटलं...
हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची 11 वर्षीय नात आराध्या बच्चन हिने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली हायकोर्टानं यूट्यूबवर टीका केलीय.
आराध्यानं याचिकेत म्हटलं होतं की, ‘एका यूट्यूब चॅनेलनं माझ्या आयुष्याशी आणि आरोग्याशी संबंधित खोट्या बातम्या प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे या वृत्तांकनावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.’
दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आराध्याच्या याचिकेतल्या मागणीशी सहमत होत म्हटलं की, लोकांना चुकीच्या माहितीपर्यंत पोहोचवण्यास यूट्यूबही दोषी आहे.
2. कविता आणि अंकिताच्या लग्नाला मान्यता मिळेल का?
भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे. लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANKITA AND KAVITA
एकीकडे अनेक समलिंगी जोडपी आणि LGBTQ+ समुदायासाठी काम करणारे कार्यकर्ते अशा विवाहांना मान्यता मिळेल अशी अपेक्षा करतायत.
तर दुसरीकडे सरकार आणि धार्मिक नेत्यांचा समलिंगी विवाहांना विरोध केला आहे.
या सुनावणीतून काय अपेक्षित आहे? जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात.
3. इशांत शर्मा परतला आणि दिल्लीचं गुणांचं खातं उघडलं
पावसामुळे दिल्ली-कोलकाता मुकाबला गुरुवारी रात्री उशिरा सुरू झाला आणि सोप्या गोष्टी अवघड करण्याच्या दिल्लीच्या सवयीमुळे सामना संपायला शुक्रवार उजाडला. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या साक्षीने दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामात गुणांचं खातं उघडलं.

फोटो स्रोत, Getty Images
विजयासाठी 128 धावांचं छोटेखानी लक्ष्य मिळालेल्या दिल्लीला एकाक्षणी 30 चेंडूत 24 धावांची आवश्यकता होती. समीकरण सोपं असतं.
कठीण खेळपट्टी आणि सतत पडणाऱ्या विेकेट्स यामुळे दिल्लीला शेवटच्या षटकात 6 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. अनुभवी अक्षर पटेलने कोलकाताला चमत्कार करू दिला नाही आणि दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अक्षरने 22 चेंडूत 19 धावांची खेळी केली.
4. नव्या शालेय अभ्यासक्रमात कोणते बदल होतील आणि तज्ज्ञांचं मत काय?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात (NCF) अनेक बदल सूचवले आहेत.
शालेय शिक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक मसुद्यात माध्यमिक शिक्षणात बहुविध विषयांचं शिक्षण, एका वर्षात दोनदा बोर्डाच्या परीक्षा आणि 12 वीच्या इयत्तेत सेमिस्टर प्रणाली लागू करण्याचे मुख्य प्रस्ताव आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या मसुद्यात वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, कपडे, भाषा आणि संस्कृतीशी संबंधित इतर विषयांवरही प्रस्ताव देण्यात आलेत.
गोलाकार आणि अर्ध गोलाकार आकारासारखी वर्गाची रचना ठेवण्याचाही प्रस्ताव आहे.
5. सुदानमध्ये काय घडतंय, कशावरून निर्माण झाला वाद?
सुदानची राजधानी खार्तूममध्ये शनिवारी लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये झालेल्या गोळीबार आणि स्फोटानंतर परिस्थिती कठीण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुदानच्या लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये (रॅपिड सपोर्ट फोर्सेस) मध्ये हा तणाव सुरू आहे.

फोटो स्रोत, Reuters
ऑक्टोबर 2021 मध्ये सुदान मध्ये बंड होऊन सत्तापालट झाली. त्यानंतर देश सैन्याच्या जनरल्स कौन्सिलद्वारे चालवला जातोय. सुदान मधील वादामागे दोन लष्करातील प्रमुख आहेत.
जनरल अब्देल फताह अल-बुरहान सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत आणि जनरल्स कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत.
तर जनरल मोहम्मद हमदान डगालो हे रॅपिड सपोर्ट फोर्सेस सर्वेसर्वा असून कौन्सिलचे उपाध्यक्षही आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























