घरकुल योजनेतलं नंदुरबारच्या या लोकांचं घर कुणी पळवलं?

व्हीडिओ कॅप्शन, घरकुल योजनेतलं नंदुरबारच्या या लोकांचं घर कुणी पळवलं?
घरकुल योजनेतलं नंदुरबारच्या या लोकांचं घर कुणी पळवलं?
Published

पंतप्रधान आवास योजनेतील आदिवासी लाभार्थींच्या नावाने खोटी कागदपत्रं करून घरकुलाचे पैसे हडप करण्याचा प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीला आलाय. इतकंच नाही तर लाभार्थींच्या नावाने बँकेत खोटी खातीही उघडली गेली.

आवास योजना संपूर्णपणे ऑनलाईन असते. त्या साईटवर नेमलेल्या अभियंत्याने प्रत्यक्ष साईटवर जाऊन जिओ टॅग केलेला फोटो टाकल्याशिवाय अनुदान बँकेत जमा होत नाही. बँकेत आधारकार्ड आणि प्रत्यक्ष केवायसी केल्याशिवाय खातंही उघडलं जात नाही.

इतकं असूनही आदिवासींना अंधारात ठेवून बँकेत अनुदान जमा झालं आणि अनोळखी व्यक्तीने ते काढून घेतलं. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर हा सगळा प्रकार धक्कादायकरित्या बीबीसी मराठीच्या समोर आला.

या प्रकरणात वापर झालेल्या आदिवासींची आणि यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींची भेट घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. त्यानंतर जे समोर आलं ते पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.

  • रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
  • व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
  • निर्मिती- प्राजक्ता धुळप

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)