मान्सूनला काय झालं आहे? पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सांगतात...

मान्सूनला काय झालं आहे? पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सांगतात...
Published

मान्सूननं यंदा पुण्या-मुंबईत दमदार पदार्पण केलं, पण त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतायत.

मान्सून पुन्हा कधी सक्रीय होईल? पुढे कधी सरकेल आणि पुढच्या काही दिवसांत हवामान कसं असेल, याविषयी पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बातचीत केली आहे बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी.