गावात एसटी यायची थांबली आणि या मुलींच्या शिक्षणात अडथळा आला
गावात एसटी यायची थांबली आणि या मुलींच्या शिक्षणात अडथळा आला
Published
इस्लामपूर पासून अगदी 15 किलोमीटर वर हायवेच्या कडेला असणाऱ्या काळमवाडी या आपल्या गावातून कॉलेज साठी ये जा करायची तर आरतीला त्यासाठी दररोज दोन अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. याशिवाय दररोज बस साठी काही तासांची वाट पहाणे हेही नेहमीचं. याचा परिणाम म्हणून तिच्या निम्म्याहून अधिक मैत्रिणींचं शिक्षण थांबून त्यांची लग्न झाल्याचं ती सांगते. कोव्हिड नंतर गावातल्या बसेसची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतोय का? पाहा बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट
रिपोर्ट – प्राची कुलकर्णी
शूट – नितीन नगरकर
एडिट – निलेश भोसले






