एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल

निर्माती एकता कपूर (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निर्मात्या एकता कपूर (फाइल फोटो)
    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हिंदी मालिका-चित्रपट निर्मात्या एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्या विरोधात 'अल्ट बालाजी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या एका मालिकेवरुन पॉक्सो कायद्याअंतर्गत (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अल्ट बालाजीने अल्पवयीनांसदर्भातील आरोप फेटाळले आहेत.

अल्ट डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट कंपनीने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की "गंदी बातमध्ये चित्रित झालेली सर्व दृश्यं ही कायदेशीर बाबींचे पालन करूनच चित्रित करण्यात आली आहेत. तसेच अल्पवयीनांसंदर्भात जे वृत्त माध्यमांमध्ये फिरत पूर्णतः चुकीचे आहे."

कंपनीने पुढे म्हटले आहे की, "हे स्पष्ट करण्यात येत आहे की एकता कपूर आणि शोभा कपूर यांचा कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात सहभाग नसतो. कंपनीचे कामकाज, व्यवस्थापन आणि नियोजन हे वेगळ्या टीमकडून पाहिले जाते. कंपनीचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्ही अधिकाऱ्यांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कंपनी यावर विस्ताराने भाष्य करण्याचे टाळत आहे."

अल्ट बालाजी निर्मित 'गंदी बात' या वेब सीरिजमधील अल्पवयीन मुलींवर बोल्ड सीन चित्रित झाल्याचे आरोप या प्रकरणात लावण्यात आले आहे.

ज्या एपिसोडसंदर्भात हा वाद निर्माण झाला आहे तो फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान प्रसारित झाला होता.

या एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींचे बोल्ड सीन दाखवण्यात आल्याचे आरोप आहेत. तक्रार दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये बोल्ड कंटेट सोबत धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील बोरिवलीच्या MHB पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. बोरिवलीच्या स्वप्निल रिवाजी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.

तसेच मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशावरून एकता कपूर आणि त्यांच्या आईविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

निर्माती एकता कपूर हिच्यावर मुंबईतील बोरिवलीत गुन्हा दाखल झालाय

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, निर्मात्या एकता कपूर यांच्यावर मुंबईतील बोरिवलीत गुन्हा दाखल झालाय

या शोमध्ये गणवेशातील शाळकरी मुलांना चुंबन घेताना दाखवण्यात आलं आहे. शिवाय सिगरेटच्या जाहिरातींचा वापर करून महापुरुष आणि संतांचा अपमान करण्यात आल्याचा आणखी एक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच काही सीनमध्ये आक्षेपार्ह आणि भावना दुखावणाऱ्या गोष्टींचा देखील समावेश असल्याचं म्हटलंय.

पॉक्सो कायदा काय म्हणतो?

"लैंगिक अपराधांपासून अल्पवयीन मुलांना संरक्षण देण्यासाठी पॉक्सो कायदा तयार करण्यात आला," अशी माहिती मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ वकील नरेंद्र दुबे यांनी बीबीसी हिंदीसोबत बोलताना दिली.

पॉक्सोअंतर्गत विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले की, "पॉक्सो कायद्याच्या कलम 13 आणि 15 नुसार अल्पवयीन मुलांशी संबंधित असलेल्या अश्लील कंटेटसंदर्भातील गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पोक्सो कायद्यांतर्गत लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोक्सो कायद्यांतर्गत लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

यामध्ये अल्पवयीन मुलांचा 'अश्लील कारणांसाठी' वापर केल्यास कमीत कमी पाच वर्षे आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

जर एखाद्यी व्यक्ती अल्पवयीन मुलांसंदर्भातील अश्लील साहित्य स्वतःकडे ठेवत असेल परंतु ते नष्ट करत नसेल तर कमीत कमी 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

कलम 13 आणि कलम 15 मध्ये काय सांगितले आहे ?

कलम 13 अंतर्गत, अल्पवयीन मुलांचे अश्लील किंवा नग्न फोटो आणि व्हिडिओ काढणे, वितरित करणे किंवा प्रसारित करणे हा अपराध मानला जातो.

कोणत्याही व्यक्तीने इंटरनेट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असे साहित्य तयार किंवा वितरित केल्यास तो अपराध ठरतो. अशा गुन्ह्यांसाठी कलम 13 मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कलम 15 अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने कलम 13 मध्ये नमूद केलेले गुन्हे केले असतील तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. पहिल्यांदा दोषी आढळल्यास दोषीला कमीत कमी 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो.

तर, सदर व्यक्तीनं पुन्हा असा किंवा अशा प्रकारचा गुन्हा केल्याल त्याला कमीत कमी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि ही शिक्षा दंडासह जन्मठेपेपर्यंत वाढू देखील शकते.

या कलमांचा मुख्य हेतू अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून शिक्षा देणे हा आहे.

कलम 13 अंतर्गत, अल्पवयीन मुलांचे अश्लील किंवा नग्न फोटो आणि व्हिडिओ काढणे, वितरित करणे किंवा प्रसारित करणे हा अपराध मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

अल्ट बालाजीवर प्रदर्शित या सीरिजबाबत बोलताना वकील नरेंद्र दुबे म्हणाले, एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक मान्यतांचा अपमान करण्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीविरोधात हे कलम लावण्यात येते.

दरम्यान, या वेबसिरिजचे आतापर्यंत सात सीझन रिलीज झाले आहेत. सचिन मोहिते यांनी या सीरिजची दिग्दर्शन केले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.