You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी दहशतवादी नाही, मला फक्त बोलायचंय', म्हणणाऱ्या रोहित आर्याचा मृत्यू कसा झाला?
मुंबईतल्या गजबजलेल्या पवई मरोळ परिसरामध्ये महावीर क्लासिक नावाच्या इमारत परिसरात दुपारी तीन वाजताच्या सुमारास रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने तरुण मुला-मुलींना आणि काही व्यक्तींना स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली.
पोलिसांच्या दाव्यानुसार, त्याला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे.
या मुला-मुलींना रोहित आर्याने अभिनयाच्या ऑडिशनसाठी या परिसरामध्ये बोलावले होते. त्यानंतर पुढचा सगळा प्रकार घडला आहे.
पोलीस अधीक्षक दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबई पोलिसांच्या पथकाने मदतकार्य सुरू केले आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या ऑपरेशनदरम्यान मुलांना वाचवताना ती व्यक्ती जखमी झाली, तिला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आणि नंतर त्याची मृत्यूची नोंद करण्यात आली.'
या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव रोहित आर्या आहे.
तो 2017 पर्यंत पुण्यात राहायचा, त्यानंतर मुंबईत स्थायिक झाला.तो व्यावसायिक होता, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.