'आमच्या घराला आग लागली म्हणून लोक मदतीला आले, त्यातले काही लोक चोरी करून गेले'

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यातल्या आग लागली आणि टिंबर मार्केटसह शेजारील घरांचं नुकसान झालं
'आमच्या घराला आग लागली म्हणून लोक मदतीला आले, त्यातले काही लोक चोरी करून गेले'
Published

पुण्यातल्या भवानी पेठ इथल्या आगीत नुकसान झालेल्या महिलांची ही व्यथा. पुण्यातल्या टिंबर मार्केटमध्ये गुरुवारी मोठी लागली.

पहाटे 4च्या सुमारास लागलेल्या या आगीत लाकडाच्या गोदामासह शेजारील 4 घरांनीही पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या घरांमधले 10 सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला.

या टिंबर मार्केटमधले एकूण 5 ते 6 लाकडाचे गोदाम जळून खाक झाले. मात्र, या आगीची झळ टिंबर मार्केट शेजारील घरांनीही बसली. यात इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)