दीपिका पदुकोणनं पठाण चित्रपटात घातलेल्या बिकिनीवरून वाद

दीपिका पदुकोणनं पठाण चित्रपटात घातलेल्या बिकिनीवरून वाद
Published

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा टीझर जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हापासून या सिनेमाबद्दल काही ना काही वादही सुरू आहेत.

12 डिसेंबरला या सिनेमातलं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा शाहरुखला ट्रोल करण्यात येतंय.

केवळ शाहरुखच नाही, तर दीपिका पदुकोणलाही सोशल मीडिया युजर्सने ट्रोल केलं आहे. एकीकडे शाहरुख आणि दीपिकाचं ‘पठाण’मधलं ‘बेशरम रंग’ हे गाणं इंटरनेटवर व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे या गाण्यावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.