You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ दगावल्याचे आरोप
मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ दगावल्याचे आरोप
Published
मुंबईच्या साहिदुन अन्सारी या 26 वर्षांच्या महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 29 एप्रिलला मृत्यू झाला. ही घटना भांडूपमधील पालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये घडली.
ही घटना घडली तेव्हा साहिदुन यांचं कुटुंब हॉस्पिटलमध्ये होतं. त्या दिवशी वीज गेली आणि नंतर जनरेटरही नादुरुस्त असल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सिझेरिअन सर्जरी करावी लागली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
रिपोर्ट आणि शूट- प्रशांत ननावरे