मुंबईतल्या अपघातग्रस्त 'बेस्ट' बसच्या आतील CCTV दृश्यं पाहा

व्हीडिओ कॅप्शन, कुर्ला बस अपघाताची CCTV दृश्यं
मुंबईतल्या अपघातग्रस्त 'बेस्ट' बसच्या आतील CCTV दृश्यं पाहा
Published

मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर सोमवारी (9 डिसेंबर) रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 43 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेतील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला. या बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला अटक करण्यात आलेली आहे.

105,108,118 कलमा अंतर्गत ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती डीसीपी गणेश गावडे यांनी दिली आहे. कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टाने आरोपी संजय मोरे याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.