स्वप्नील कुसाळेच्या विजयानंतर वडील म्हणतात, 'माझ्या मुलानं तिरंगा खाली येऊ दिला नाही'
स्वप्नील कुसाळेच्या विजयानंतर वडील म्हणतात, 'माझ्या मुलानं तिरंगा खाली येऊ दिला नाही'
Published
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलंय.
भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळाली आहेत.
50 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये चीनच्या नेमबाजाला सुवर्णपदक तर, युक्रेनच्या नेमबाजाला रौप्यपदक मिळालं, तर तिसऱ्या क्रमांकावर राहत स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्निलनं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं.





