संदीप सिंह: लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हरियाणाच्या क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

sandeep singh

फोटो स्रोत, Getty Images

Published

महिला अॅथलिट आणि ज्युनियर कोचने भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत FIR दाखल केली आहे.   

चंदीगड पोलिसांनी संदीप सिंह यांच्यावर पाठलाग करणे, लैंगिक शोषण करणे आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली FIR दाखल केला.

FIR दाखल झाल्याच्या काही तासांनंतरच संदीप सिंह यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, क्रीडा मंत्रालयाचा प्रभार मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सुपूर्द केलाय.

FIR चंदीडगच्या सेक्टर 26 पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय. मात्र, संदीप सिंह यांनी महिला अॅथलिट आणि कोचनं केलेले आरोप फेटाळले आहेत.

चंदीगडचे डीएसपी रँकच्या पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, संदीप सिंह यांच्याविरोधात IPC च्या कलम 354, 354-ए, 354-बी, 342 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महिला कोचने म्हटलं की, “मला निष्पक्ष तपासाचं आश्वासन देण्यात आलंय. मी माझ्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. मला सोशल मीडियावर धमकावलं जातंय. भीतीनं मी कुणाचेही फोन उचलत नाहीय.”

संदीप सिंह

फोटो स्रोत, @FLICKERSINGH

“क्रीडामंत्री संदीप सिहं यांनी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान ऑफस आणि इतर ठिकाणी लैंगिक शोषण केलं. एकदा त्यांनी मला चंदीगडस्थित सेक्टर सात येथील घरी येण्यास सांगितलं. ते कायम सोशल मीडियावरून माझ्याशी बोलत असत. चंदीगडस्थित घरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला. मी सर्व माहिती चंदीगड पोलिसांना दिलीय.”

तक्रारदार महिला पोलीस मुख्यालयात एकटीच पोहोचली होती. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, “संदीप सिंह यांनी पाठवलेले मेसेज आता माझ्याकडे नाहीत. कारण ते डिसअपियरिंग मोडमध्ये पाठवण्यात आले होते.”

संदीप सिंह यांनी काय सांगितलं?

इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अजय सिंह चौटाला यांच्या ऑफिसमधून पत्रकार परिषद घेऊन तक्रारदार महिलेनं क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात आरोप केले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, महिलेच्या आरोपानंतर संदीप सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

यावेळी संदीप सिंह म्हणाले की, “ज्युनियर कोच (महिला) ची नियुक्त झज्जरमध्ये होती. मात्र, पंचकुलामध्येही त्यांना राहायचं होतं. मी त्यांना क्रीडा विभागात अर्ज करायला सांगितलं होतं आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, खेळाडूंमध्ये अशाप्रकारचं नियोजन करावं, जेणेकरून प्रशिक्षणावर परिणाम होणार नाही. या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी. चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे.”

संदीप सिंह कोण आहेत?

संदीप सिंह भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार आहेत. हरियाणाच्या खट्टर सरकारमध्ये क्रीडामंत्रिपदी ते कार्यरत होते.

ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह यांना पेनल्टी कॉर्रन तज्ज्ञ मानलं जातं. क्रीडा क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी 2010 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं.

सिनेनिर्माता शाद अलीने संदीप सिंह यांच्या जीवनावर ‘सुरमा’ नामक सिनेमाही काढला होता. अभिनेता-गायक दलजीत दोसांझने संदीप सिंह यांची भूमिका साकारली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)