हडप्पा संस्कृतीतलं हे शहर ओसाड का पडलं?
जवळपास पाच हजार वर्षं जुनी हडप्पा संस्कृती. सिंधू नदीच्या खोऱ्यात ही संस्कृती बहराला आली.
आजच्या पाकिस्तानातल्या बलुचीस्तानपासून चे भारतातल्या उत्तर प्रदेश पर्यंत आणि अफगाणिस्तानपासून भारतातल्या गुजरात पर्यंत या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
या संस्कृतींचे जे अवशेष सापडले आहेत त्यातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे...ढोलावीरा.
ते गुजरातमधल्या कच्छच्या पांढऱ्या वाळवंटाच्या काठाशी वसलेलं आहे. या ढोलावीराला एका रहस्याची झालर आहे.
रिपोर्ट – अनघा पाठक
शूट – मंगेश सोनावणे
एडिट – निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



