दारुच्या नशेत बायकोशी अनैसर्गिक संबंध, नवऱ्याला अटक  #5मोठ्याबातम्या

दारुच्या नशेत पत्नीशी अनैसर्गिक संबंध 

फोटो स्रोत, Getty Images

Published

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. दारुच्या नशेत पत्नीशी अनैसर्गिक संबंध 

दारुच्या नशेत पत्नीशी अनैसर्गिक संबंध 

फोटो स्रोत, Getty Images

दारुच्या नशेत स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्याची घटना मुंबईत घडली आहे. रविवार 4 डिसेंबर रोजी रात्री ही घटना मुलुंड पोलिसांना एम. टी. अग्रवाल रुग्णालयाकडून समजली आहे. या घटनेतील आरोपीचे वय 40 आहे.

या घटनेत मद्यपी पतीने दारुच्या नशेत पत्नीशी अनैसर्गिक संबंध ठेवले तसेच त्यावेळी त्याचा 4 वर्षांचा मुलगाही समोरच होता. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.  

या बातमीनुसार, मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात एक 35 वर्षीय महिला गुप्तांग दुखत असल्याची तक्रार घेऊन आली होती. डॉक्टरांनी विचारपूस केल्यावर पतीने दारुच्या नशेत येऊन आपल्याला मारहाण केली तसेच गुप्तांगात प्लॅस्टिकची वस्तू घुसवली असे तिने सांगितले.

तपासणीमध्ये महिलेच्या गुप्तांगांना जखमा दिसल्या. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. 

2. त्यांनी हात उचलला, तर तुम्हीही हात उचला- राज ठाकरे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौऱ्यावर आहे.

या दौऱ्यात त्यांनी विविध पदाधिकारी आणि नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असून त्यांना काही कानमंत्रही दिले आहेत.

काल सोमवार 5 डिसेंबर रोजीच्या दौऱ्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.  

त्यांनी हात उचलला, तर तुम्हीही हात उचला- राज ठाकरे 

फोटो स्रोत, Getty Images

रत्नागिरी जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी काही विधाने केली आहेत.

त्यात ते म्हणतात, “मुंबईत गेल्यावर माझ्या काही बैठका होतील. पक्ष जितका घट्ट बांधता येईल, तितका घट्ट बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो. लवकरच तुमच्यापर्यंत काही कार्यक्रम येतील, हे कार्यक्रम राबवत असताना कुणाचीही पर्वा करू नका. कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या. मी वकिलांची फौज उभी करेन. हे मी तुम्हाला मुद्दामहून आताच सांगतोय,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. 

राज ठाकरे पुढे म्हणाले, “समोरचे जसे वागतील, तसंच आपण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपल्याकडूनही हातच उचलला गेला पाहिजे. आणखी ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मी उघडपणे बोलू शकत नाही. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत बोलेन.”

3.  आठवीतल्या मुलांनी केला सामूहिक बलात्कार 

मुंबईमध्य़े बलात्काराची आणखी एक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलांनी त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

ही बातमी टाईम्स नाऊ मराठीने दिली आहे. या बातमीनुसार माटुंगा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली आहे. 

आठवीतल्या मुलांनी केला सामूहिक बलात्कार 

फोटो स्रोत, Getty Images

या वर्गातील मुले नृत्याच्या सरावासाठी बाहेर गेले असताना दोन मुलांनी या मुलीवर अत्याचार केले. या घटनेमुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

तिने ही घटना कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार दोघांविरोघात भादंवीच्या 376 डीए आणि पॉक्सो कायद्यातील कलमांनुसार कारवाई जाली असून आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची कारवाई बालसुधारगृहात झाली आहे. 

4. अजित पवारांची वसंत मोरेंना ऑफर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपल्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं मोरे यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत माहिती दिली आहे. 

अजित पवारांची वसंत मोरेंना ऑफर 

फोटो स्रोत, Getty Images

वसंत मोरे यांनी पुण्यात झालेल्या एका लग्नसमारंभातला प्रसंग सांगितला.

ते म्हणाले, “मी लग्नात स्टेजवरून खाली उतरलो आणि रुपाली चाकणकर यांच्याशी बोलत उभा होतो. त्यावेळी दूरवर असलेल्या अजितदादांशी माझी नजरानजर झाली. यानंतर आम्ही दोघेही गर्दीतून वाट काढत एकमेकांपाशी गेलो. तेव्हा दादा म्हणाले की, अजून किती दिवस नाराज. या आम्ही वाट बघतोय. त्याच्यानंतर जातानाही अजित पवार म्हणाले की, वसंतराव मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही या माझ्याकडे, आपण बोलू. यानंतर अजित पवार निघून गेले.” 

तसेच अजून तरी आपल्याला राजसाहेब प्रिय आहेत असंही त्यांनी सांगितलं.

5. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी गर्दी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील लाखो अनुयायी चैत्यभूमिवर उपस्थित झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

  

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत. असे महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. 

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)