आपण चांगल्या मैत्रिणी होणार.... उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांच्यावर प्रकाशित झालेल्या बातम्याचा थोडक्यात आढावा.
1. आपण चांगल्या मैत्रिणी होणार.... उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले
जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता ती चित्रा वाघ यांच्याबाद्दलच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असं वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आता उर्फीने चित्रा वाघ यांना उद्देशून नवं ट्वीट केलं आहे. मी भाजपात गेले तर चित्रा वाघ यांची मैत्रिण होईन. मी त्याची वाटच पाहात आहे. चित्रा वाघ तुम्ही भाजपात गेल्यावर तुमची सर्वांची मैत्री झाली होती, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना केलेल्या सर्व चुका माफ केल्या गेल्या, हे तुम्हाला आठवतंय का? असं म्हणून दुसऱ्या ट्वीटमध्ये आपण लवकरच चांगल्या मैत्रिणी होणार चित्रू असं उर्फीने लिहिलं आहे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
2. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात सरकारच्या हालचाली
अदानी कंपनीला वीज वितरणाची परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. संपावर गेल्यास मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे.
महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा ठिकाणी साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
3. दुसरे विश्व मराठी संमेलनांचे आयोजन
जगभरातील मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी 2 विश्व मराठी संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच आठवड्यात ही दोन संमेलनं होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
वरळी येथे आज 4 जानेवारीपासून होणाऱ्या या संमेलनात जगभरातील पाचशेहून अधिक तर विविध राज्यांतून बाराशेहून अधिक मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याचा मराठी भाषा विभागाचा अंदाज आहे. या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
पिंपरी येथे 6 ते 8 जानेवारीदरम्यान 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड अशा विविध देशांमधील मान्यवर मराठीजनांचा सहभाग असणार आहे.
4. भारताचा श्रीलंकेवर 2 धावांनी विजय
टीम इंडियाने टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 2 धावांनी विजय मिळवला आहे.
यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर ऑलआऊट केलं. शिवम मावीने या विजयात मोठा वाटा उचलला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
मावीने पदार्पणातील सामन्यातच 4 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि सीरिज डिसायडर सामना हा पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये 5 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. ही बातमी टीव्ही 9 ने प्रसिद्ध केली आहे.
5. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्याला जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच अयोध्येत येणार आहेत, अशी माहिती अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज यांनी 1 जानेवारी रोजी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अयोध्य्याेला भेट देतील. त्यानंतर अधिकृत दौऱ्याची घोषणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघ्न दास आणि छबिराम दास महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)